AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panchayat Raj Day : ग्रामपंचायतकडून शाश्वत विकासाचा संकल्प; पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव

देशपातळीवर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून 9 पैकी किमान 1 व जास्तीत जास्त संकल्पना निवडण्यासाठी व निवडलेल्या संकल्पनाची माहिती व्हायब्रँट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ग्रामपंचायतला दिल्या आहेत.

Panchayat Raj Day : ग्रामपंचायतकडून शाश्वत विकासाचा संकल्प; पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव
ग्रामपंचायतकडून शाश्वत विकासाचा संकल्पImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 8:24 PM

ठाणे : येत्या पंचायत राज दिनी (Panchayat Raj Day) होणाऱ्या ग्रामसभे (Gramsabha)त जिल्ह्यातील ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा संकल्प करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. पृथ्वीच्या रक्षणाबरोबरच गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी तसेच सन 2030 पर्यंत नागरिकांना शांतता व समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी हा संकल्प करणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या संकल्पनांची माहिती केंद्र सरकारच्या व्हायब्रॅंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर देखील प्रसिद्धी केली जाणार आहे. देशभरातील विविध ग्रामपंचायतीमधून झालेल्या चांगल्या कामाची माहिती देशभरातील सर्व ग्रामपंचायतीना होण्यासाठी 11 ते 17 एप्रिल या दरम्यान दिल्लीत आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. (On the day of Panchayat Raj, the Gram Panchayat will pass a resolution for sustainable development)

आगामी काळात शाश्वत विकासाच्या ध्येयाची जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने जी ध्येय निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थाचे योगदान महत्वाचे ठरणार आहे.

ग्रामसभांच्या संकल्पनांचे विषय

1. गरीबीमुक्त व उप जीविका वृद्धीस पोषक गाव 2. गावातील सर्वांना उत्तम आरोग्य 3. बालकांना पूर्ण क्षमतेने जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा अधिकार 4. घरघगुती नळ जोडणी, स्वच्छ व पुरेसे पिण्यायोग्य पाणी 5. स्वच्छ आणि हरित गाव 6. पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव 7. सामाजिक दृष्टीने सुरक्षित गाव 8. सुशासन युक्त गाव 9. लिंग समभाव पोषक गाव

व्हायब्रट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड

देशपातळीवर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून 9 पैकी किमान 1 व जास्तीत जास्त संकल्पना निवडण्यासाठी व निवडलेल्या संकल्पनाची माहिती व्हायब्रँट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ग्रामपंचायतला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हात 431 ग्रामपंचायत ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका व्हायब्रँट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्डवर ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आली असून ग्रामसभा झाल्यानंतर त्याचा अहवाल देखील पोर्टलवर अपलोड केला जाणार आहे. (On the day of Panchayat Raj, the Gram Panchayat will pass a resolution for sustainable development)

इतर बातम्या

TMC : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन’

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.