AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : प्लास्टिक पिशवी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कांदे फेकले, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक प्रकार

कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले.

Kalyan : प्लास्टिक पिशवी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कांदे फेकले, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक प्रकार
प्लास्टिक पिशवी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कांदे फेकले
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 2:54 PM
Share

कल्याण : कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई गलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रितसर तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या घटनेचा म्युनिसिपल कामगार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांनी कारवाई करणाऱ्या पथकावर कांदे फेकत शिवीगाळ केली

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदी बाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल व त्यांच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी सांगितले.

म्युनिसिपल कामगार संघटनेकडून घटनेचा निषेध

या घटनेनंतर म्युनिसिपल कामगार संघटनेने निषेध नोंदवला आहे. एपीएमसीमध्ये कारवाई हे आमचे काम नाही यासाठी एपीएमसीने स्वतंत्र पथक नेमले पाहिजे. आज हा हल्ला झालाय, या घटनेचा म्युनिसिपल कामगार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून मारहाण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता किरकोळ बंद करण्याचे आदेश दिले होते

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रसार आणि कल्याण डोंबिवलीतील वाढती रुग्णसंख्या पाहता केडीएमसीने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन व्यापाऱ्यांना सांगितले होते. तसेच घाऊक व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य असल्याचे म्हटले होते.  (Onions were thrown at a team carrying plastic bags to the APMC market in Kalyan)

इतर बातम्या

Pune crime | चाकण येथे मालवाहू गाडीच्या धडकेत दोन युवक ठार; एक गंभीर जखमी :अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद

Nashik Accident| सेल्फी हजेरीची धावपळ कर्मचाऱ्याच्या जीवावर; दुसऱ्या घटनेत सायकलपटूला उडवले!

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.