शिवसेना की भाजप?, प्रचाराचा धुरळा थांबला: पालघर जिल्हा पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

पालघर जिल्हा पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी म्हणजे मंगळवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. (palghar zp and panchayat samiti elections voting on 5th october)

शिवसेना की भाजप?, प्रचाराचा धुरळा थांबला: पालघर जिल्हा पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान
Palghar-ZP-Election
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 5:14 PM

पालघर: पालघर जिल्हा पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी म्हणजे मंगळवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पालघर जिल्ह्यातील 29 जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 व पंचायत समितीचे 9 अशा 11 जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांवर बहुरंगी लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना बाजी मारणार की भाजप? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर या गटामध्ये 5 तर नंडोरे देवखोप या गटामध्ये 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर तालुक्यातील 9 पंचायत समिती गणासाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार एकमेकांना आव्हान देणार असल्याने ही निवडणूक तालुक्यात चुरशीची होईल असं दिसतं.

नंडोरे देवखोपमध्ये चित्रं काय?

नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीसाठी चर्चेचा विषय बनला आहे. या गटामध्ये प्रत्यक्षात शिवसेना-भाजप अशी दुरंगी लढत असली तरी बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार उभा केल्यामुळे काही मतांच्या फरकाने उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. अवघ्या 90 मतांनी पराजय झालेल्या गेल्या वेळच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराला यंदा पुन्हा संधी मिळाली असली तरी विद्यमान सदस्यपद रद्द झालेल्या भाजपच्या महिला उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळ शिवसेनेचाच येथील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात मते फिरवल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी त्यांच्यासमोर विकास कामांच्या आश्वासनांचा डोंगर उभा करुन शिवसेना आणि भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत. या गटातील काही गावांमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असल्यामुळे ही निर्णायक मते सेना भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

नवापूर पंचायतीत चौरंगी लढत

नवापूर पंचायत समिती गणांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. या भागामध्ये शिवसेना आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. असं असलं तरी भाजपही त्याच प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने इथे चांगला उमेदवार दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यातही मते पडतील असा त्यांचा विश्वास आहे. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या सालवड पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा अशी दुरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवाराचे पद रद्द झाल्यामुळे पुन्हा त्यांना तिथे संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपच्या रूपाने त्यांना कडवे आव्हान असणार आहे. सरावली अवधनगर पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस अशी लढत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसही या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नात आहे.

सरावलीत थेट लढत

सरावली या गणांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असले तरी शिवसेना व भाजप अशी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने शिवसेनेचे कडवे आव्हान पेलल्याचे त्यांच्या प्रचारातून दिसून येते. मात्र येथील मतदार कोणाला आपला उमेदवार ठरवतील हे येणारा काळच सांगेल. मान गणामध्ये यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आले होते. त्यानंतर हे पद रद्द झाल्यामुळे आता येथे मनसेच्या माजी उमेदवारासह शिवसेना व भाजपच्या स्थानिक उमेदवाराला संधी दिल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. मनसेमार्फत मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी खटपट सुरू आहे. तर याउलट शिवसेना व भाजपा या भागांमध्ये आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी विविध मतदारांना प्रभावीत करून त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचे दिसत आहे.

पालघर तालुक्यातील 9 पंचायतीतील चित्रं काय

पालघर तालुक्यातील 9 पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी यांचा मतदारांवर प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. असं असलं तरी आता होत असलेल्या पोट निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासह काही ठिकाणी माकपने आपले उमेदवार उभे करून सेना-भाजपला आव्हान दिले आहे. यामुळे सेना-भाजपची अनेक मते बहुजन विकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे वळणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षाही आगामी निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन उमेदवार दिले असले तरी हे उमेदवार स्थानिक स्तरावरचे असल्याने स्थानिक मतदार त्यांना पसंती देतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य 5 ऑक्टोबर रोजी मतदार मतपेटीत बंद करणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी यापैकी कोणत्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे, हे निकाला दिवशीच स्पष्ट होईल.

पालघर तालुका जि.प.गट

सावरे एम्बुर-5 नंडोरे- देवखोप-6

पालघर तालुका पं.स.गण

नवापुर-6 सालवड- 5 सरावली (अवधनगर)-5 सरावली-5 मान-6 शिगाव खुताड-6 बऱ्हाणपूर-6 कोंढाण-4 नवघर घाटीम-4

संबंधित बातम्या:

Maharashtra News live Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावे, नुकसानीची भीषण दृश्य पाहा : आमदार नमिता मुंदडा

रावसाहेब दानवेंकडून उद्धव ठाकरेंना ‘त्या’ वक्तव्याची आठवण, शेतकरी मदतीवरुन सरकारवर निशाणा

सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान अखेर अटकेत, इतर 8 जणांवरही कारवाई, आता पर्याय काय?

(palghar zp and panchayat samiti elections voting on 5th october)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.