VIDEO : कल्याणमध्ये घरात घुसून महिलेला मारहाण, दागिने घेऊन अल्पवयीन चोरटे पसार, दोघांची बालसुधारगृहात रवानगी

गणेश विसजर्ना दरम्यान सारिका चव्हाण यांनी 13 तोळ्याची गंठण घातली होती. इतक्या मोठ्या दागिन्यावर या दोघांची नजर पडली आणि या दोघांची नियत फिरली. त्याच रात्री या दोघांनी चोरी करण्याचे ठरवले, अशी माहिती चोरट्यांनी दिली. यातील एकाच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहे. दुसऱ्याच्या विरोधात मारहाणीचे गुन्हे आहेत.

VIDEO : कल्याणमध्ये घरात घुसून महिलेला मारहाण, दागिने घेऊन अल्पवयीन चोरटे पसार, दोघांची बालसुधारगृहात रवानगी
कल्याणमध्ये घरात घुसून महिलेला मारहाण, दागिने घेऊन अल्पवयीन चोरटे पसार
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 4:17 PM

कल्याण : एका महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत दागिने (Jewelery) लंपास करणाऱ्या अल्पवयीन दुकलीला खडकपाडा पोलिसां(Khadakpada Police)नी ताब्यात घेतले आहे. दोघांचीही बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वत्सला देशमुख आणि सारिका चव्हाण अशी मारहाण करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. मारहाणीत या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माघी गणेश विसर्जनाच्या वेळी सारिका चव्हाण यांनी गळ्यात घातलेले महागडे दागिने बघून या दोन अल्पवयीन मुलांची नियत फिरली. यानंतर या मुलांनी रात्री त्यांच्या घरात घुसखोरी करत सारिका आणि त्यांची आई वत्सला यांना बेदम मारहाण करुन दागिने घेऊन पसार झाले. दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. (Police arrest minor thieves for stealing women’s jewelery in Kalyan)

माघी गणेशोत्सवासाठी माहेरी आलेल्या महिलेला लुटले

कल्याण पश्चीमेतील आटाळी मानी परिसरात राहणाऱ्या वत्सला चिखले यांची मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत आईच्या घरी माघी गणेशोत्सवासाठी आली होती. गणेश विजर्सनानंतर चौघे घरात झोपले असता मध्यरात्री दोन चोरटे घरात घुसले. घरातील दागिने घेऊन चोरटे घराबाहेर निघत असतानाच आई आणि मुलीची झोप उडाली. चोरट्यांचा प्रतिकार करताना चोरट्यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या आई व मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने यांनी तपास सुरु केला.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरांना पकडले

या परिसरात लागलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये दोन मुलं बाईकवरुन जाताना आढळून आली. पोलिसांचा तपासाची चक्रे फिरवत अखेर या चोरट्यांना अटक केले. यानंतर दोघा चोरट्यांची कसून चौकशी करण्यात आली. गणेश विसजर्ना दरम्यान सारिका चव्हाण यांनी 13 तोळ्याची गंठण घातली होती. इतक्या मोठ्या दागिन्यावर या दोघांची नजर पडली आणि या दोघांची नियत फिरली. त्याच रात्री या दोघांनी चोरी करण्याचे ठरवले, अशी माहिती चोरट्यांनी दिली. यातील एकाच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहे. दुसऱ्याच्या विरोधात मारहाणीचे गुन्हे आहेत. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. (Police arrest minor thieves for stealing women’s jewelery in Kalyan)

इतर बातम्या

ATM कार्डला जन्म तारखेचा पिन ठेवणं महागात, रेल्वे अधिकाऱ्याचे 75 हजार टीव्ही अभिनेत्याने उडवले

ड्रायव्हरची डुलकी जीवावर, गुरुभेटीला जाताना पुणेगावातील त्यागी महाराजांचा अपघाती मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.