Ulhasnagar Theft : मोबाईल खेचून पळाला, अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला!, उल्हासनगरात चोरटा अटकेत
उल्हासनगरच्या कॅम्प 1 मध्ये राहणारे कैलास सुखवानी हे रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास बिर्ला गेट परिसरात उभे होते. यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल खेचून शहाड स्टेशनच्या दिशेनं धूम ठोकली.
उल्हासनगर : मोबाईल खेचून पळणाऱ्या एका इराणी चोरट्याला अवघ्या काही क्षणातच पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. उल्हासनगर पोलिसांनी समयसूचकता दाखवत ही कारवाई केली. जाफर गुलाब इराणी असे अटक करण्यात चोरट्याचे नाव आहे. चोरट्याकडून मोबाईल (Mobile) आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी (Two Wheeler) हस्तगत करण्यात आली आहे. या चोरट्याच्या नावे अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून सुखवानी यांचा चोरलेला मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. ही दुचाकीसुद्धा त्याने मुंब्रा इथून चोरल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. (Police arrested a thief in Ulhasnagar for stealing a mobile phone)
पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी खिशातून मोबाईल खेचला
उल्हासनगरच्या कॅम्प 1 मध्ये राहणारे कैलास सुखवानी हे रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास बिर्ला गेट परिसरात उभे होते. यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल खेचून शहाड स्टेशनच्या दिशेनं धूम ठोकली. यावेळी सुखवानी यांनीही त्याचा पाठलाग केला. हा चोरटा शहाड स्टेशनच्या परिसरात येताच ट्रॅफिकमुळे त्याचा वेग मंदावला. त्यामुळे सुखवानी यांनी आरडाओरडा करताच शहाड चौकीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. मोबाईल चोरल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच या चोरट्याला पकडण्यात पोलिसांच्या समयसूचकतेमुळे यश आले.
अंबरनाथमध्ये चोरटा जेरबंद
रात्रीच्या वेळी परिसरात फिरून चोऱ्या करणाऱ्या एका चोरट्याला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देवप्रकाश राय असे त्याचे नाव असून त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. अंबरनाथच्या जुने अंबरनाथ गाव, धर्माजी कॉलनी परिसरात हा चोरटा चोऱ्या करत होता. या भागात राहणाऱ्या चंद्रपाल मौर्या यांच्या घरी त्याने 27 जून 2020 च्या रात्री चोरी करून 76 हजार 100 रुपयांची रोकड चोरली होती. तर याच भागात राहणाऱ्या अब्रार शाह याच्या घरून त्याने 4 मार्च 2022 च्या रात्री दोन मोबाईल चोरून नेले होते. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चोरटा देवप्रकाश राय याचा मग काढत त्याला बेड्या ठोकल्या. यानंतर त्याने 2020 साली चंद्रपाल मौर्या यांच्या घरी केलेल्या चोरीचीही कबुली दिली. (Police arrested a thief in Ulhasnagar for stealing a mobile phone)
इतर बातम्या
VIDEO : उल्हासनगरात भरधाव डंपरने पाळीव श्वानाला चिरडलं, कुर्ला कॅम्प परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद