Badlapur Protest : प्रशिक्षण दिलेल्यांच्या बदल्या होतात, किती पोलिसांना प्रशिक्षण द्यायचे?, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या

आपण कालच बदलापूरला भेट दिली आहे, ही निंदनीय घटना आहे, काल शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेही सोबत होते, मुख्यमंत्र्यांनी SIT ची घोषणा केलेली आहे, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी म्हटले आहे.

Badlapur Protest : प्रशिक्षण दिलेल्यांच्या बदल्या होतात, किती पोलिसांना प्रशिक्षण द्यायचे?, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या
SUSIEBEN SHAH
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 3:00 PM

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एफआयआर’ दाखल करण्यात जो विलंब झाला त्याला शाळा, पोलीस ठाण्यासह सर्वच जण जबाबदार आहेत असे परखड बोल बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी सुनावले आहेत. गुन्हा 12 तारखेला घडला होता. 13 तारखेला त्या लहान मुलींनी तिच्या आईला कम्प्लेंट केली. 13 तारीखेला आणि त्यांना कळलं की असं नक्कीच काही प्रकार झालेला आहे. महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र विभाग असायला हवा, गुन्हे शाखेप्रमाणे स्ट्रक्चर तयार करायला हवा, जो केवळ महिला आणि मुलांसाठी काम करेल असेही सुशीबेन शाह म्हणाल्या आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्यात एक बालसंरक्षण अधिकारी असायला हवा. प्रत्येक शाळेत ‘सखी सावित्री समिती’ असावी अशी आमची मागणी आहे. आपण सावित्री समितीचा रिपोर्ट मागणार आहोत. बालकल्याण समितीबद्दल लोकांना माहिती नाही, प्रत्येकाला त्याबद्दल सांगावे लागेल. प्रत्येक वॉर्डात बालसभा घ्याव्यात, या सभेत मुलांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. या सर्व प्रश्नांबाबत मी आज पत्र देणार असून सात दिवसांत उत्तरे मागणार आहोत असेही सुशीबेन शाह यांनी म्हटले आहे.

आरोपी 15 दिवस शाळेत हजर होता, त्या 15 दिवसांची माहिती आपण घेणार आहोत. निलंबित करून काहीही होणार नाही, तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे,आरोपीवर POCSO मध्ये FIR ताबडतोब नोंदवला पाहीजेत.विशेष विभागाकडे फाईल यापूर्वीच पाठवण्यात आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आज आपण स्वत: मुलीच्या कुटुंबीयांशी बोलणार आहोत, त्यांची मानसिक स्थिती अत्यंत बिकट आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्रेही लिहिली आहेत, आम्ही कायद्यानुसार यंत्रणा राबवू.अशा लोकांना शाळेत ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांना असे संबोधणे चुकीचे

चाईल्ड प्रोटक्शन हेल्पलाईन 24 बाय 7 कामाला असली तरच फरक पडेल आणि लेट महाराष्ट्र बी द फर्स्ट ज्यांनी असे एक स्ट्रक्चर उभा केलेला आहे, मी परत एकदा आवाहन करते की सीएम साहेबांना आणि देवेंद्र फडणवीसांना अशी वक्तव्य व्हायला नकोत. राजकीय व्यक्ती चुकीचे बोलत आहेत. पत्रकारांना असे संबोधणे चुकीचे आहे, त्यांनी अशी वक्तव्यं करु नयेत. अशा घटनांविरोधात मी नेहमीच आवाज उठवते. पण आता ते खूप झाले आहे. पोलिसांना प्रशिक्षण देऊन बदल्या केल्या जातात, ते किती जणांना प्रशिक्षण देणार? गुन्हे शाखेसारखा विभाग निर्माण करण्याची मागणी केली जात आहे. अशा या प्रकारच्या तक्रारीसाठी काम करेल असे फोर्स तयार करायला हवा, संवेदनशील पोलिसांची नियुक्ती अशा कामासाठी केली गेली पाहीजेत असेही शाह म्हणाल्या.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.