Ambernath Crime : अंबरनाथमध्ये ‘गुंडांची झुंड’ पोलिसांनी पकडली, गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमलेल्या 13 जणांना अटक

अंबरनाथ पूर्वेच्या वडवली सेक्शनमध्ये आमराई परिसरात 13 तरुण जमले असून त्यापैकी काही जण हे रेकॉर्डवरील गुंड असल्याने काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते जमल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी जात या तरुणांना तिथे जमण्याचं कारण विचारलं. मात्र या तरुणांनी पोलिसांना समाधानकारक उत्तरं दिली नाहीत.

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये 'गुंडांची झुंड' पोलिसांनी पकडली, गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमलेल्या 13 जणांना अटक
गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमलेल्या 13 जणांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 5:55 PM

अंबरनाथ : गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंबरनाथमध्ये जमलेल्या 13 जणांना पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. यापैकी अनेकांवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Case) दाखल आहेत. सुरज राजपूत शंकर शिंदे, राम यादव, सचिन चिकणे, आरिफ खान, बळवंत राजभर, जयेश सोनवणे, हैदरअली सिद्दिकी, जितू वाघेला, अबू बकर चौधरी, अतुल सोनवणे, राजू यादव आणि रुपेश सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी शंकर शिंदे याच्यावर यापूर्वीच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तर राम यादव याच्यावर रॉबरी, सचिन चिकणे याच्यावर दरोडा, अतुल सोनवणे याच्यावर मारहाण, तर रुपेश सिंग याच्यावर हत्या, कट रचणे, अवैधपणे अग्नीशस्त्र बाळगणे, हत्येचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात दाखल आहेत. (Police have arrested a gang of 13 youths who were trying to commit a crime in Ambernath)

आमराई परिसरात 13 तरुण जमल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई

अंबरनाथ पूर्वेच्या वडवली सेक्शनमध्ये आमराई परिसरात 13 तरुण जमले असून त्यापैकी काही जण हे रेकॉर्डवरील गुंड असल्याने काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते जमल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी जात या तरुणांना तिथे जमण्याचं कारण विचारलं. मात्र या तरुणांनी पोलिसांना समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे हे सगळे काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने याठिकाणी जमल्याचा पोलिसांना संशय आल्याने सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या सर्वांची पार्श्वभूमी पाहता हे नक्कीच या ठिकाणी एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे या सर्वांना जमावबंदीच्या कलमान्वये अटक करण्यात आली. त्यानंतर आज या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

सध्या राज्यात रमजान ईद, मनसेने दिलेला अल्टिमेटम, हनुमान चालिसा पठण या सगळ्यामुळे वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना एकत्र जमलेलं पाहून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ही कारवाई केल्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी सांगितलं. (Police have arrested a gang of 13 youths who were trying to commit a crime in Ambernath)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.