50 कुठं आणि 105 कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है, भाजप आणि शिंदे गटात बॅनर्सवार; कुठे लागले बॅनर्स?

भाजप आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद झाले आहेत. आता दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर बॅनर्सवरून टीका केली जात आहे. एकमेकांना डिवचण्याची एकही संधी दोन्ही पक्षातील नेते सोडत नसल्याचं चित्र आहे.

50 कुठं आणि 105 कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है, भाजप आणि शिंदे गटात बॅनर्सवार; कुठे लागले बॅनर्स?
poster war Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 6:35 AM

उल्हासनगर : भाजपमधील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. भाजपने शिंदे गटातील मतदारसंघात हस्तक्षेप सुरू केल्याने शिंदे गटात खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची भाषा केली. त्यानंतरही भाजपने कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ आमचाच असल्याचं सांगत भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. त्यानंतर उल्हासनगरात भाजपच आणि शिंदे गटाची बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिंदे गटाने बॅनर्स लावून भाजपला डिवचलेलं असतानाच आता भाजपने बॅनर्स लावून शिंदे गटाला डिवचले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद प्रचंड विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे.

उल्हासनगरात पुन्हा एकदा शिवसेना, भाजपमध्ये बॅनरवॉर पाहायला मिळत आहे. भाजपने बॅनर लावत शिवसेना शिंदे गटाला थेट डिवचलं आहे. 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!, असा मजकूर असलेले बॅनर्स उल्हासनगरात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. त्याखाली किंगमेकर असं लिहिलं आहे. याच बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यासह पंकजा मुंडे तसेच रवींद्र चव्हाण यांचेही फोटो आहेत. उल्हासनगरला थेट मार्केट एरियामध्येच हे बॅनर्स लागले असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

आमदाराची टीका

दरम्यान, उल्हानगरमध्ये काल ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं होत. “कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है…! माझा नेता माझा अभिमान” अशा आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये लावण्यात आले होते.

या बॅनर्सवरील टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली होती. ‘युतीची सत्ता आल्यावर काही छोटे छोटे कार्यकर्ते स्वत:ला एकनाथ शिंदे समजत आहेत. आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, असा त्यांना गर्व झाला आहे, त्यांना वाटतं आमच्याशिवाय कोणीच नाही’, अशी खोचक टीका गणपतशेठ गायकवाड यांनी केली होती.

त्या भेटीने चर्चा

दरम्यान, एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट )माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. बंद दरवाजा आड या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात सुभाष भोईर याचे भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स लागले होते. सुभाष भोईर लोकसभा निवडणूकेची तयारी आतापासूनचं करत आहे का? की भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.