Kalyan Snake Rescue : कल्याणमध्ये सर्पमित्रांकडून एकाच दिवशी चार सापांची सुटका

साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. कोणताही साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे कुठेही साप वा तत्सम प्राणी आढळून आल्यास त्यांना दुखापत करू नये. तात्काळ प्राणी-सर्प मित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्ता बोंबे यांनी केले आहे.

Kalyan Snake Rescue : कल्याणमध्ये सर्पमित्रांकडून एकाच दिवशी चार सापांची सुटका
कल्याणमध्ये सर्पमित्रांकडून एकाच दिवशी चार सापांची सुटकाImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 6:26 PM

कल्याण : उन्हाच्या काहिलीने समस्त प्राणी मात्रांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. साप (Snake) हा थंड ठिकाणी राहणारा प्राणी असल्याने गर्मीच्या ठिकाणांहून थंड ठिकाणी वास्तव्य करण्याकरीता विषारी आणि बिनविषारी सर्प बाहेर पडू लागले आहेत. थंडाव्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या 4 सापांना गुरूवारी दिवसभरात रेस्क्यू (Rescue) करण्यात आले. यात एक इंडियन कोब्रा नाग, एक विषारी घोणस, एक धामण आणि एक रसेल कुकरीचा समावेश आहे. (Rescue of four snakes in one day from animal rescue team in Kalyan)

चार विषारी आणि बिनविषारी सापांची सुटका

कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सेंचुरी कंपनीतून गुरूवारी सकाळी नऊ वाजता फोन आला. एक नाग पकडल्याचे कळताच सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. अत्यंत घातक अशा कोब्रा नागाला बिर्ला स्कूल येथून सेंचुरीच्या फायरने पकडून आणले होते. या नागाला घेऊन कल्याणच्या वन विभागाकडे आणण्यात आले. वन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. कल्याण जवळच्या उंबर्डे येथील डम्पिंग रोडच्या बाजूला साईटचे काम चालू आहे. त्यांच्या ऑफिसजवळ 4 फुटी विषारी घोणस आली होती. साईटवर असलेल्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्यानंतर अर्ध्या तासाने उंबर्डे शंकर मंदिराजवळ घराच्या भिंतीमधील धामण जातीच्या सापाची सुटका करण्यात आली.

आधारवाडी तुरूंग अधिक्षकांच्या बंगल्यामागे रसेल कुकरी नावाचा साप पकडण्यात आला. तोही बिनविषारी साप होता. या सर्व सापांना वन खात्याला दाखवून नंतर निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले. गुरूवारी सकाळपासून चार साप आढळून आले. साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. कोणताही साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे कुठेही साप वा तत्सम प्राणी आढळून आल्यास त्यांना दुखापत करू नये. तात्काळ प्राणी-सर्प मित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्ता बोंबे यांनी केले आहे. तर सर्व सापांना वन विभागाच्या परवानगीने निर्सगाच्या सानिध्यात सोडणार आल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे. (Rescue of four snakes in one day from animal rescue team in Kalyan)

इतर बातम्या

केडीएमसीत कचऱ्यापासून 10 हजार मॅट्रिक टन खत निर्मिती, सोलापूर नाशिक पुण्यातून मागणी

अंबरनाथमध्ये पालिकेचे गाळे व्यावसायिकांनी बळकावले, काही गाळ्यांमध्ये भरतोय चक्क जुगाराचा अड्डा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.