Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथचा ‘सिलेंडर मॅन’ रातोरात बनला स्टार, सोशल मीडियावर व्हायरल सागर जाधवची हवा!

अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव (Sagar Jadhav) असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय.

अंबरनाथचा 'सिलेंडर मॅन' रातोरात बनला स्टार, सोशल मीडियावर व्हायरल सागर जाधवची हवा!
सागर जाधव
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 5:13 PM

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव (Sagar Jadhav) असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचं मोठं कौतुक होतंय (Sagar Jadhav A cylinder Man from Ambernath photo goes viral on social media).

“30 किलोचा सिलेंडर उचलायचा, मग आपण 45 किलोचं असून कसं चालेल?” हे वाक्य आहे अंबरनाथचा सिलेंडर मॅन सागर जाधव याचं. याच जिद्दीने सागरनं गेल्या 2-3 वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली. त्यामुळे खांद्यावर सिलेंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला.

कसे चर्चेत आले सागरचे फोटो?

सागर हा अंबरनाथच्या भारत गॅसची एजन्सी असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. 2 दिवसांपूर्वी सागर हा अंबरनाथ स्टेशन परिसरात, सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याचे व्यक्तिमत्व पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत त्याने ते फेसबुकवर टाकले. “एखाद्या वेबसीरीजमधलं पात्र शोभावं, असा हा सिलेंडर मॅन..”, असं कॅप्शन देत, अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि त्याचे हे फोटो तुफान व्हायरल झाले. अगदी वेबसीरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्सपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या भारदस्त पर्सनॅलिटीचं कौतुक केलं आणि सागर रातोरात स्टार बनला.

कोण आहे सागर जाधव?

सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला आहे. 12वी पर्यंत शिकलेल्या सागरचं बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झालं. आई वडिलांचं छत्र हरपलेल्या सागरनं 12वी नंतर अंबरनाथला काका-काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. तो सध्या राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून सागर नोकरी करतोय.

Sagar Jadhav 2

सागरचा आधीचा फोटो

आधी अतिशय सडपातळ असलेल्या सागरला 30 किलोचा सिलेंडर उचलायचा, तर आपण 45 किलोचं असून कसं चालेल? असा प्रश्न पडला आणि त्याने मागच्या 3 वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन शरीरयष्टी कमवायला सुरुवात केली. यानंतर आता त्याला पाहिलं, की जुना सागर नक्की हाच होता का?, असा प्रश्न पडतो. सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अतिशय मेहनत करून, 4-4 मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन, पायऱ्या चढून, ते लोकांपर्यंत पोहचवून सागर त्याचं घर चालवतो. पण, आयुष्य एका रेषेत चाललं असताना अचानक असं काही तरी होईल, आणि आयुष्य रातोरात इतकं बदलेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं सागर नम्रपणे सांगतो.

सागरचं होतंय कौतुक!

सागर आता जिथे सिलेंडरची डिलिव्हरी द्यायला जाईल, तिथले लोकही उत्सुकतेनं आपल्याकडे पाहात असल्याचं सागर सांगतो. सागरच्या या स्टारडमचं त्याच्या सहकाऱ्यांनाही मोठं कौतुक आहे. सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं, असं त्याच्या मित्रांना वाटतं.

सागर हा आता सोशल मीडियावरचा सेलेब्रेटी बनलाय. पण, तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. एखाद्या वेब सीरीजची किंवा जाहिरातीची ऑफर आलीच, तर ती करायला नक्कीच आवडेल, असं तो सांगतो. पण, त्याचवेळी ‘सिलेंडर मॅन’ हीच आपली खरी ओळख असल्याचंही तो नमूद करतो. त्यामुळे अंबरनाथचा हा सिलेंडर मॅन लवकरच एखाद्या जाहिरातीत किंवा मालिका, वेब सीरीज यात दिसला, तर नवल वाटायला नको. अंबरनाथकरांनाही त्याच्या या व्हायरल ‘सिलेंडर मॅन’ सध्या प्रचंड कौतुक वाटतंय.

(Sagar Jadhav A cylinder Man from Ambernath photo goes viral on social media)

हेही वाचा :

Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

ठाणे महापालिकेची धडक कारवाई, शहरातील 13 अनधिकृत बांधकामांवर हातोडा

'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.