35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनची तार जोडली

त्यामुळे अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती श्रावण शेलवले यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली.

35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनची तार जोडली
shahapur wireman
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 7:57 AM

सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर : मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेल्याने साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका वायरमॅनने जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन पोलवरील तुटलेली हायटेन्शनची तार जोडली. त्यामुळे 35 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाला. श्रावण शेलवले असे या वायरमॅनचे नाव असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका महावितरणला बसला आहे. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार समोर आला आहे. काल (20 जुलै) शहापूर तालुक्यातील आटगाव फिडरची वीज गेल्याची घटना समोर आली होती.

30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित

यावेळी वीज दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कानविंदे या गावालगत एक तलाव आहे. या तलावात वीजेचा पोल आहे. या पोलवर लाईटचा कंडक्टर तुटला आहे. त्यामुळे अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती श्रावण शेलवले यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली.

भर पावसात पोहत जाऊन तार जोडणी

ही माहिती मिळाल्यानंतर श्रावण यांनी भर पावसात सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य नसताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी मारली. जनतेची सेवा करण्यासाठी वायरमॅन श्रावण यांनी हातातले हँडग्लोव्हज आणि पक्कड या गोष्टी तोंडात पकडल्या. त्यानंतर पुढे पाण्यात पोहत जाऊन पोलवर चढून तुटलेली तार जोडली. यामुळे 35 गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत फोडसे नावाचे आणखी एक वायरमॅन उपस्थितीत होते.

श्रावण शेलवले आणि फोडसे या दोघांच्या या कामगिरीमुळे 35 गावांचा वीज पुरवठा पूर्ववत होण्यास मदत मिळाली आहे. या महावितरणच्या दोन्ही जनसेवकांचे शहापूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.

(Shahapur Wireman swimming in the lake to connect high-tension wire for restore Power outage in 35 villages)

संबंधित बातम्या :

वेळ विचारण्याचा बहाणा, पार्कात बाकड्यावर बसलेल्या सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार!

अगरवूड तेलाची बेकायदा विक्री करणारा कारखाना उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

Youngest Serial Killer | जगातील सर्वात तरुण सिरीअल किलर भारतीय, वय अवघे आठ वर्ष, धाकट्या बहिणीसह तिघींची हत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.