ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या या नेत्यावर जोरदार हल्लाबोल

राणे यांच्यावर खरंच परिणाम झाला आहे. त्यांना खरंच उपचार करावे लागतात. त्यांना कोणाला जमत नसेल, तर आम्ही आता त्यांना ओढून आणून उपचार करायची वेळ आली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या या नेत्यावर जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 4:34 PM

उल्हासनगर : शरद कोळी यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.  नारायण राणे यांची कंपनी हिजडी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी असे सभेमध्ये म्हटलं ते नारायण राणे यांना उद्देशून म्हटलं होतं. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेला सोडून नारायण राणे हे सोनिया गांधी यांच्या चपला उचलण्याचं काम करत होते. म्हणून नारायण राणे यांना हिजड्याची उपमा दिली होती. बाळासाहेबांनी दिलेली उपमा 100% योग्य आणि बरोबर आहे. हिजड्याला बाळासाहेब हिजडाच म्हणणार. म्हणजेच नारायण राणे हिजड्याची कंपनी आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केला.

शरद कोळी म्हणाले, अमित शहांची ऍलर्जी आहे. मात्र मातोश्रीवर गुजराती चालतात. सगळेच गुजराती गद्दार नाहीत. काही गुजराती आहेत मोदी आणि शहा सारखे जातीवादी. मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जातिवादी औलादींना किंमत नाही. त्यामुळे मातोश्री आणि शिवसैनिक शिंदे कंपनी, फडणवीस आणि राणे, गृहमंत्री या सगळ्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असे फटके शरद कोळी यांनी लगावले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांचा राजकीय लव्ह जिहाद

यावर बोलताना शरद कोळी म्हणाले, राणे यांच्यावर खरंच परिणाम झाला आहे. त्यांना खरंच उपचार करावे लागतात. त्यांना कोणाला जमत नसेल, तर आम्ही आता त्यांना ओढून आणून उपचार करायची वेळ आली आहे. लव जिहाद साहेबांचा नाही, तर लव जिहाद राणे कंपनीने केला आहे. शिवसेनेला सोडलं, काँग्रेसबरोबर झकमारी झाली. काँग्रेसला सोडलं आता भाजपबरोबर केला आहे.

आता त्याच्याबरोबर तरी नीट राहा म्हणून सांगा. परत अजून दुसऱ्याचा हात धरून कोणाबरोबर जाऊ नका. नारायण राणे आता तरी नीट राहा. किती आगाऊपणा करशील? तुझी उंची किती? तू बोलतो किती? तुझ्या आवाक्यात राहा. आता शिवसैनिकांच्या तू डोक्यावरून चाललाय. शिवसैनिकांनी काही उलट सुलट केल्यावर वाईट वाटून घेऊ नको, अशा शब्दात शरद कोळी यांनी फटकारले.

आदित्य ठाकरे छोटा पेंग्विन

नितेश राणे यांचा बाप आहे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही. अरे बिगर दाढी मिशाच्या, तुला काही कळतं का? डोक्याचा भाग आहे का? याचं लग्न कसं काय झालं? मला काही कळत नाही. आणि याचं लग्न केलं कोणी? हेच समजत नाही. अरे बिगर मिशाच्या तुला डोक्याचा भाग आहे का? कसा आहे आमचा फकडा नाद खुळा… नुसतं मिशीवरनं ताव फिरवतोय कसा. तुला आधी मिशा तरी येऊ दे आणि मग बोल, अशी समज शरद कोळी यांनी नितेश राणे यांना दिली.

नितेश राणे दिसतोच नेपाळी

नितेश राणे नेपाळी दिसतो, हे मी काय सगळे महाराष्ट्रातले लोक आणि बाहेरच्या राज्यातले लोकही सांगतील. हे नेमकं महाराष्ट्रातलं आहे की नेपाळमधलं आहे. नेपाळमधला दिसल्यावर नेपाळी नाहीतर गुजराती म्हणू का?, असा सवाल शरद कोळी यांनी विचारला.

2024 निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात

काय राव.. वेड्या माणसाला, खेडेगावातल्या माणसाला कळायला लागलं.. महिना १५ दिवसात हा शिंदे कुठे दिसतोय की नाही, अशी परिस्थिती झाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार. वा रे गुरु… मानलं की तुम्हाला. शिंदे साहेबांचा गबाळ भरायचं कामच भाजपने केलं आहे.

राष्ट्रवादीने शिवसेना संपवली

खरंतर गद्दार, धोकेबाज, जातीवादी ही भाजप आहे. आजपर्यंत आम्हालाच कळलं नाही. आम्ही त्यांना मोठं केलं. जवळ घेतलं. पण खरा विषारी ही भाजप आहे. त्यामुळे उद्धव साहेबांनी या भाजपवाल्यांचा कमरेत लाथ घालून हाकलून दिलं आहे, अशी टीकाही शरद कोळी यांनी केली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.