Thane accident : ४० मजली इमारतीच्या छतावर काम सुरू होतं, अचानक लिफ्ट कोसळली आणि घात झाला

ठाणे येथे मोठी दुर्घटना घडली. ४० मजली इमारतीचे काम पूर्णत्वास आले होते. वॉटर प्रुफिंगचे काम सुरू होते. तेवढ्यात घरी परतणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला. लिफ्ट कामगारांच्या अंगावर कोसळली.

Thane accident : ४० मजली इमारतीच्या छतावर काम सुरू होतं, अचानक लिफ्ट कोसळली आणि घात झाला
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 10:42 PM

ठाणे, १० सप्टेंबर २०२३ :  बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले. ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत होते.  तेवढ्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरी परतणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला. लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली.

४० मजली इमारतीचे काम

वेळ संध्याकाळची काम आटोपले होते. कामगार निवांतपणे घरी जात होते. तेवढ्यात अघटित घटना घडली. अचानक अंगावर लिफ्ट कोसळली. या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला. एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रुफिंगचं काम सुरू होतं. लिफ्टचा दोर तुटल्याने लिफ्ट घरी परतणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

सहा कामगारांचा मृत्यू

बाळकुम परिसरात रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढले

बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी आणखी एकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. लिफ्ट का कोसळली याचा तपास आता पोलीस करतील. त्यानंतर कामगारांचा मृत्यू का झाला. याला जबाबदार कोण, हे समोर येईल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.