AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Dog Attack : उल्हासनगरात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला, सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशाचं इंजेक्शनही नाही

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी नालंदानगर परिसरात सुरेश शेळके हे पत्नी आणि मुलीसह वास्तव्याला आहेत. 16 जून रोजी ते गावाहून परतल्यानंतर त्यांची मुलगी आरोही ही अंघोळ करून घराबाहेर खेळायला गेली. याच वेळी परिसरातल्या एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घालत तिचे लचके तोडले.

Ulhasnagar Dog Attack : उल्हासनगरात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला, सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशाचं इंजेक्शनही नाही
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 12:11 AM
Share

उल्हासनगर : उल्हासनगरात भटक्या कुत्र्या (Dog )ने एका चिमुकलीवर हल्ला (Attack) केला आहे. यानंतर या मुलीला श्वानदंशाचं इंजेक्शन (Dog bite Injection) देण्यासाठी पालकांची उल्हासनगरपासून कळवा आणि मुंबईच्या सरकारी रुग्णालयांपर्यंत फरफट झाली. उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये ही घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर भटक्या कुत्र्यांसह आरोग्य व्यवस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारी रुग्णालयात साधं श्वानदंशाचं इंजेक्शनही उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनी जायचे कुठे ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घराबाहेर खेळत असताना मुलीवर कुत्र्याचा हल्ला

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी नालंदानगर परिसरात सुरेश शेळके हे पत्नी आणि मुलीसह वास्तव्याला आहेत. 16 जून रोजी ते गावाहून परतल्यानंतर त्यांची मुलगी आरोही ही अंघोळ करून घराबाहेर खेळायला गेली. याच वेळी परिसरातल्या एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घालत तिचे लचके तोडले. यावेळी आरोहीचा आरडाओरडा ऐकून सुरेश शेळके यांनी तिथे धाव घेत आरोहीची या कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र शेळके कुटुंबियांची खरी फरफट इथूनच सुरू झाली.

उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात श्वानदंशाचे इंजेक्शन नाही

आरोहीला जखमी अवस्थेत घेऊन त्यांनी उल्हासनगरचं मध्यवर्ती शासकीय रुग्णालय गाठलं. पण तिथे त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात फिरवण्यात आलं. त्यानंतर श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याचं सांगत त्यांना कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगण्यात आलं. तिथून ट्रेनने शेळके दाम्पत्य जखमी आरोहीला घेऊन कळव्याला गेले. मात्र तिथेही त्यांना तासभर बसवून नंतर श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं सायन हॉस्पिटलल जायला सांगण्यात आलं. त्यामुळं शेळके हे तिथून खासगी गाडी करून मुंबईला पोहोचले आणि मुलीवर उपचार करून घेतले. मात्र या सगळ्यात चिमुकल्या आरोहीचे मोठे हाल झाले. या सगळ्यात शासकीय रुग्णालयांमध्ये साधं श्वानदंशावरील इंजेक्शनही उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Stray dog attacks girl in Ulhasnagar, no dog bite injection in government hospitals)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.