VIDEO | किनाऱ्यावर कार लावून फेरफटका महागात, भरती आल्यामुळे लाटेसोबत स्विफ्ट समुद्रात

कळंब समुद्र किनाऱ्यावरुन भरतीच्या पाण्यात ही कार वाहत भुईगाव किनाऱ्यावर आली असल्याचा अंदाज आहे. | car drown in Sea

VIDEO | किनाऱ्यावर कार लावून फेरफटका महागात, भरती आल्यामुळे लाटेसोबत स्विफ्ट समुद्रात
स्विफ्ट कार समुद्रात बुडाली
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 11:47 AM

वसई: वसईच्या भुईगाव येथे एक स्विफ्ट कार (Car accident) समुद्रात बुडाल्याचा चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या दृष्टीस ही कार पडली. त्यानंतर आता ही कार समुद्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, ही गाडी नेमकी कोणाची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. (Car Swept Away By Sea in Vasai)

कळंब समुद्र किनाऱ्यावरुन भरतीच्या पाण्यात ही कार वाहत भुईगाव किनाऱ्यावर आली असल्याचा अंदाज आहे. आज सकाळी गस्तीवर असणाऱ्या वसई पोलिसांना ही कार पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसली आहे. कार पूर्णपणे समुद्रात बुडालेल्या अवस्थेत असून फक्त तिचा वरचा टप आणि काच दिसत होती. समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटर आतमध्ये समुद्रात ही कार आहे.

सकाळपासून वसई पोलीस ठाण्यातील पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून ट्रॅक्टरच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कार समुद्रातील रेतीमध्ये फसल्याने तिला बाहेर काढणे जिकिरीचे होत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, पण पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी आहे. वसई विरार महापालिकेने ही नवीन वर्षाच्या स्वागताची नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. समुद्रावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. पण नियमांना बगल देत हौशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर जात असल्याचे उघड झाले आहे.

काल रात्रीच्या वेळी पर्यटकांनी ही कार समुद्राच्या किनाऱ्यावर लावून मौजमजा करीत असावेत. रात्री साडे दहाला समुद्रात भरती होती. या भरतीत ही कार समुद्रात वाहून गेल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

अक्सा समुद्रकिनाऱ्यावर सापडला महिलेचा मृतदेह

मालाडच्या अक्सा समुद्रकिनाऱ्यावर प्लॅस्टिकच्या गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी मालवणी पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी महिलेच्या सासऱ्यासह तिघांना अटक केली होती.

या महिलेचे नाव नंदनी रॉय असून तिने प्रेमविवाह केला होता. मात्र, ही गोष्ट तिच्या सासऱ्यांना आवडली नव्हती. त्यामुळेच सासऱ्यांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत कोंबून अक्सा समुद्रकिनाऱ्यावर टाकून दिला.

संबंधित बातम्या:

न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

फक्त मुंबई-पुणे नाही, दिल्ली-गुजरातमधून न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात

थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच

(Car Swept Away By Sea in Vasai)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.