डोंबिवली,अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात दोन महिने टँकर बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी १४ मे पासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टँकर बंदी करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे (thane) जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर (badlapur) औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी १४ मेपासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (shrikant propkari) यांनी दिली आहे. अनेकदा धोकादायक पद्धतीचं केमीकल नदीच्या पाण्यात सोडलं जात असल्यामुळं टँकरला बंदी घालण्यात आली आहे. नदीच्या पाण्यात आत्तापर्यंत अनेकदा केमिकल (chemical) सोडण्यात आल्यामुळे लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
संध्याकाळपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. यावर आळा घालण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस व वाहतूक पोलिसांकडून औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला संध्याकाळपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी सांगितले.
केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते
औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते असल्याने पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होत असल्याने निर्णय घेतला आहे. अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली.
नदीच्या पाण्यात यापुर्वी अनेकदा टँकरमधील केमिकल सोडण्यात आलं आहे, त्यामुळे लोकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.