धो डाला! ठाणे, पालघरमध्ये पावसाचं धुमशान; सकाळपासून जोरदार हजेरी

ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला. सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चाकरमान्यांची दाणादाण उडाली. (Thane and Palghar continue to receive heavy rains)

धो डाला! ठाणे, पालघरमध्ये पावसाचं धुमशान; सकाळपासून जोरदार हजेरी
Thane heavy rains
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 11:42 AM

ठाणे: ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. (Thane and Palghar continue to receive heavy rains)

ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला. सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चाकरमान्यांची दाणादाण उडाली. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. ढगाळ वातावरण असल्याने सूर्य दर्शनही झालं नाही. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी सुरू. आकाश काळेकुट्ट झाल्याने दिवसभर पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या शहरातील सखल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.

पालघरमध्ये भात शेतीला झोडपले

पालघर जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघर, चिंचणी, जव्हार, मोखाडा, डहाणू भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने पालघरमधील भात शेतीला झोडपले आहे. भात उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता

वसई, विरार, नालासोपारामध्ये रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. परिसरामध्ये पूर्णपणे काळेकुट आभाळ झाले असून संपूर्ण ढगाळ वातावरण झाले आहे. या भागात आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील सकल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.

मराठवाड्यातही दमदार हजेरी

औरंगाबाद शहरात दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरु होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच पैठण, पाचोड, सिल्लोड, करमाड भागातही धुवांधार पाऊस सुरु झाला. मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीसह उस्मानाभाग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

मराठवाड्यात यलो अलर्ट?

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसण्याचे संकेत अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे. (Thane and Palghar continue to receive heavy rains)

संबंधित बातम्या:

Weather Update: मराठवाड्यात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग; पैठण, पाचोड, करमाड परिसरात धुवाँधार

आडव्यातिडव्या पावसाने नाशिकला झोडपले; दोन दिवस दमदार अंदाज

नाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

(Thane and Palghar continue to receive heavy rains)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.