Thane: कल्याण-डोंबिवलीत रिक्षा चालकांची मनमानी; परस्पर केली भाडेवाढ
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचालकांची (Kalyan dombivali) मनमानी थांबायचे नाव घेत नसून रिक्षा चालकांनी परस्पर भाडेवाढ केल्याची धक्कादायक बाब समोर आली. रिक्षाभाडे दरावरून (rickshaw fare hike) आरटीओने वारंवार रिक्षाचालकांचे कान टोचले मात्र रिक्षाचालकांनी शेअर भाडे दरात दोन रुपयांची वाढ करत प्रवाशांची लूट सुरू ठेवली आहे. गांधीनगर, गणेशनगर, पी अँड टी कॉलनी येथील शेअर दरात वाढ झाल्याचा फलक […]
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचालकांची (Kalyan dombivali) मनमानी थांबायचे नाव घेत नसून रिक्षा चालकांनी परस्पर भाडेवाढ केल्याची धक्कादायक बाब समोर आली. रिक्षाभाडे दरावरून (rickshaw fare hike) आरटीओने वारंवार रिक्षाचालकांचे कान टोचले मात्र रिक्षाचालकांनी शेअर भाडे दरात दोन रुपयांची वाढ करत प्रवाशांची लूट सुरू ठेवली आहे. गांधीनगर, गणेशनगर, पी अँड टी कॉलनी येथील शेअर दरात वाढ झाल्याचा फलक रिक्षा चालक मालक संघटनेने लावला आहे. आरटीओला कानोकान खबर लागू न देता रिक्षाचालक प्रवाशांवर भाडेवाढ लादत असून, आरटीओ अशी बघ्याची भूमिका किती दिवस घेणार, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. उप प्रादेशिक परिवहन विभागाने लागू केलेले शेअर रिक्षा भाडे रिक्षाचालकांना मान्य नसून, वाढीव भाडे मिळावे अशी त्यांची मागणी आहे. सध्या पावसाचे दिवस असून, रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान होऊन मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे. खड्ड्यातील रस्त्यांवरून जायचे असल्यास रिक्षाचालक वाढीव भाडे आकारत आहेत.
खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांचा मोर्चा
खड्झयांमुळे चालकांना त्रास सहन करावा लागत आहे, एका प्रवाशाला आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही केडीएमसी प्रशासन खड्डे बुजविण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत प्रशासनाचा निषेध करत सोमवारी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी पालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविता येत नाही.
नागरिकांना देखील चालताना त्रास होतो. चालकांना खड्ड्यांमुळे पाठीचे, मानेचे, मणक्याचे आजार जडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झाल्याने डोंबिवली पश्चिमेत खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविता येत नाही. नागरिकांना देखील चालताना त्रास होतो. चालकांना खड्ड्यांमुळे पाठीचे, मानेचे, मणक्याचे आजार जडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झाल्याने डोंबिवली पश्चिमेत रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांनी प्रभाग कार्यालयावर रिक्षांसह मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात रिक्षा चालकांनी खड्डे भरा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा पालिकेला दिला होता. आश्वासन देऊन आठवडा उलटला तरी रस्त्यांवरील खड्डे भरले न गेल्याने रिक्षाचालक संतप्त झाले होते.