AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उल्हास नदीला पूर परिस्थिती असताना बारवी डॅमचे स्वंयचलित दरवाजे उघडणार, अभियंत्याचं तहसीलदारांना महत्त्वाचं पत्र

बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवलं आहे.

उल्हास नदीला पूर परिस्थिती असताना बारवी डॅमचे स्वंयचलित दरवाजे उघडणार, अभियंत्याचं तहसीलदारांना महत्त्वाचं पत्र
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 11:27 PM

मुंबई | 26 जुलै 2023 : राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे. असं असताना आता बदलापूरमध्ये असणारं बारवी धरणदेखील जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडणार आहेत आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग होणार आहे.

बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात बारवी धरणातून बारवी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत माहिती देण्यात आली आहे.

धरणाच्या कार्यकारी अभियंतांनी तहसीलदारांना पत्रात काय सांगितलंय?

आज 26 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता धरणाची पातळी 70.50 मी. एवढी वाढली असून बारवी धरणाचा संभाव्य येवामुळे पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बारवी धरणावरती 11 स्वयंचलित वक्रद्वारे बसविण्यात आलेली आहेत. त्याची विसर्ग पातळी 72.60 मी. इतकी आहे. बारवी धरणाची पाणी पातळी 72.60 मी. तलांकारवर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरु होईल. तसेच पाणी पातळी 72.60 मी. तालकांपेक्षा खाली गेल्यांनतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप बंद होऊन पाण्याचा विसर्ग थांबेल, असं पत्राक म्हटलं आहे.

सद्यस्थितीतील चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही 72.60 मी. तलांक गाठून स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो, असा इशारा पत्रामार्फत देण्यात आलाय.

कृपया बारवी नदीच्या तिरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली आणि नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी गांवातील नागारिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना आणि पर्यटकांना प्रवेश न करण्याबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करणेबाबत सूचना आपल्या स्तरावारुन देण्यात याव्यात ही विनंती, असं आवाहन पत्रात करण्यात आलं आहे.

भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.