VIDEO | ठाण्यातील संतापजनक प्रकार, कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या वापरल्याचे दिसत आहे. (Plastic Garbage Bags use for Pack COVID Deadbody)

VIDEO | ठाण्यातील संतापजनक प्रकार, कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर
ठाण्यातील संतापजनक प्रकार, कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 11:43 AM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे सर्व कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्याही कमालीची वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे शव वाहून नेण्यासाठी कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमीत याबाबतचा एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. (Thane Municipal Jawahar Bagh Cemetery Use Plastic Garbage Bags for Pack COVID Deadbody)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे महानगरपालिकेचे सर्व दावे सपशेल फेल ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका हद्दीतील एका स्माशनभूमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या वापरल्याचे दिसत आहे. हे पाहून संतापाची लाट उसळली आहे.

मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. यामुळे दररोज अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. सध्या कोविड सेंटर्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच आता मृतदेह गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या संपल्या आहे. त्यामुळे चक्क कचऱ्याच्या काळ्या पिशव्या वापरण्यात येत असल्याचा निंदनीय प्रकार जवाहरबाग स्मशानभूमीत समोर आला आहे.

अनेक कोविड सेंटर्स बाहेर शववाहिन्या तासनतास उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. तसेच पिशव्याअभावी मृतदेह सोपाविण्यास विलंब होत असल्याने स्मशानभूमीत प्रचंड गर्दी होत आहे. कोट्यवधींचे वार्षिक बजेट असलेल्या ठाणे महापालिकेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे ठाण्याचे महापौर आणि पालकमंत्र्यांनी इकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी केली आहे.

मृतदेह पॅकिंगसाठी पिशव्यांची कमतरता नाही, महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा दावा

मात्र दुसरीकडे ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी मृतदेह पॅकिंगसाठी पिशव्यांची कमतरता नाही, असा दावा केला आहे. कोणत्याही कोरोनाबाधित मृतदेह पीपीई किट घातल्याशिवाय शिवाय हात लावू नये. तसेच मृतदेह पॅकिंगसाठी पिशव्यांची कमतरता नाही. तरीही या सर्व प्रकारची चौकशी करु, असेही त्यांनी सांगितले. (Thane Municipal Jawahar Bagh Cemetery Use Plastic Garbage Bags for Pack COVID Deadbody)

संबंधित बातम्या : 

VIDEO: साताऱ्यातील विदारक परिस्थिती; बेड नसल्यामुळे महिलेवर रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना पत्रं

ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.