Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक अन् मराठा आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट भाष्य; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं महाराष्ट्राच्या मूडवर भाष्य. आगामी लोकसभा निवडणुकीवर स्पष्ट बोलले. पाहा काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे....

Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक अन् मराठा आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट भाष्य; म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 2:28 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 17 ऑक्टोबर 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज ठाणे शहर दौऱ्यावर आहेत. ठाणे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा शहराचा दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडून टघर चलो’ अभियान राबवलं जातंय. जुन्या स्टेशन रोडवरील व्यापारी आणि नागरिकांबरोबर संवाद साधण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत? मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे लोकांना प्रश्न विचारत आहेत. ठाण्याचा खासदार हा आमचा संकल्प आहे. इथला सर्वात जास्त मताने येणार आहेत. भाजपचं नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मी आज ठाण्यात फिरलो. नरेंद्र मोदी हेच येत्या काळातही पंतप्रधान झाले पाहिजेत, असं सर्वसामान्य लोक म्हणत आहेत. महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये 100 महिला आमदार असतील. तरूण वर्गदेखील येणाऱ्या काळात आताचे मोदीच निवडून येणार असं म्हणत आहेत. घर चलो अभियान आम्ही राबवत आहोत. मागच्या 9 वर्षात केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आज ठाण्यात संवाद सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवतोय. ठाण्यातील साडेतीन लक्ष घरी पोहचणार आहोत. लोकांपर्यंत सरकारचं काम पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. आमचे आमदार 288 मतदारसंघात हा प्रवास करणार आहेत. निवडणूक येणारा उमेदवार हा महायुतीचा खासदार असणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांच्या महाविजयची तयारी आम्ही करत आहोत, असंही बावनकुळे म्हणालेत.

ठाणे आणि कल्याण हा मतदारसंघ ना कोणी मागितला ना कोणी दिला… जागेचा वाटप जे होईल. पण हा मतदारसंघ महायुतीतीलच मित्र पक्षाकडे जाईल. शिंदे गटाकडे, अजितदादांकडे किंवा आमच्याकडे असेल. पण जो उमेदवार दिला जाईल. त्याला निवडणून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोणाकडे किती जागा जातील, हे केंद्रीय समिती ठरवेल. राज्यात 45 खासदार निवडून आणायचा संकल्प असणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्या करण्याकरता एक दिलाने आम्ही काम करत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या नाकारतेपणामुळे हे आरक्षण गेलं. हे रेकॉर्ड वरती आहे. हे रेकॉर्ड वरती राहणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी सक्षम आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी सरकार काम करत आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.