Thane News : ठाणे पालिकेच्या गेटवर बेवारस बॅगमुळे ‘बॉम्बाबोंब’! बॉम्बशोधक पथकाकडून बॅगेची तपासणी
बॅग नेमकी कुणाची? बॅगच्या आतमध्ये काय? यावरुन ठाण्यात बॉम्बाबोंग सुरु झाली होती.
ठाणे : ठाणे पालिका (Thane Municipal Corporation) परिसरात शुक्रवारी खळबळजनक घटना घडली. पालिकेच्या (Thane News) आवारातील गेटवर एक बँग आढळून आली. ही बँग संशस्यास्पद असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. यानंतर लगेचच पोलिलांना या बॅगबाबत कळवण्यात आलं. ही बेवासर बँग असल्यानं ठाणे पालिका इमारतीच्या आवारासह आजूबाजूला एकच गोंधळ उडाला होता. फोनवर पोलिसांना या बॅगबाबत माहिती देण्यात आली. ‘ठाणे पालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक बॅग सापडली आहे, लवकर या’ असा फोन कॉल येताच पोलिसांनी तातडीनं पालिकेच्या दिशेने धाव घेतली. पाचपाखाडी (Thane Pachpakhadi) येथील पालिका मुख्यालयाबाहेर तोपर्यंत भीतीचं वातावरण होतं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर लोकांना बॅगपासून दूर हटवलं. काही मीटर अंतरावर लोकांना रोखून धरण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह श्वान पथकालाही पाचारण केलं. त्यानंतर या बॅगेची तपासणी करण्यात आली. अखेर ही बॅग रिकामी असल्याचं स्पष्ट झाल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कुणाची होती बॅग?
महापालिकेच्या गेटवर आढळलेली ही बेवासर बॅग एका बॅग डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीची असल्याचं समोर आलं. ठाणे पालिका मुख्यालयात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुख्यालयाच्या गेट क्रमांक दोन समोरील झाडाखाली ही बेवारस बॅघ आढळून आली आल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं होतं.
बॅग नेमकी कुणाची? बॅगच्या आतमध्ये काय? यावरुन ठाण्यात बॉम्बाबोंग सुरु झाली होती. अखेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सगळा संभ्रम दूर केला. त्यानंतर सगळ्यांच्याच जीवात जीव आला.
साकिनाका बलात्कार प्रकरणी मोठी बातमी :
पुण्यानंतर ठाणे…
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी पुण्यातही वेवारस बॅग आढळून आली होती. ही बॅग नंतर बॉम्बशोधक पथकाच्या मदतीनं नष्ट करण्यात आली होती. पुणे रेल्वे स्थानकात आढळलेल्या बॅगमुळेही एकच खळबळ उडाली होती. यानंतर पुणे रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म नंबर एक पूर्णपणे खाली करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीं याप्रकरणी गंभीर दखल घेत कारवाई केली होती.