Video | रोशनी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; माझ्या पोटात दुखतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय… राजकीय प्रतिक्रियेला वैयक्तिक हल्ल्याचं उत्तर का?

ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

Video | रोशनी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; माझ्या पोटात दुखतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय... राजकीय प्रतिक्रियेला वैयक्तिक हल्ल्याचं उत्तर का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 1:43 PM

ठाणे : एखाद्या राजकीय पोस्टला मी उत्तर दिलं तर त्याचा वैयक्तिक राग काढला गेला. ठाण्यात मुख्यमंत्र्यांची दडपशाही सुरु आहे. आम्ही सुरक्षित नाही, हेच यावरून दिसून आलंय. आज मला पोटात प्रचंड मारहाण केली. मला खूप दुखतंय. श्वास घ्यायला त्रास होतोय, अशी प्रतिक्रिया रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांनी दिली. ठाण्यात ठाकरे (Thackeray) गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली, असे आरोप शिंदे यांनी केले आहेत. यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. रोशनी शिंदे यांनी एका फेसबुक पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हा राडा झाल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणावरून मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे लवकरच रोशनी शिंदे यांची भेट गेणार आहेत.

रोशनी शिंदे काय म्हणाल्या?

ठाण्यातील कासारवडवली या भागात सदर प्रकार घडला. शिंदे गटातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टीव्ही 9 शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ मी कुणालाही वैयक्तिक बोलले नाही. साहेबांची बायको नाचू शकते का, असं विचारलं होतं. कोणते साहेब वगैरे काही बोलले नव्हते. शिंदे गटाच्या महिला रात्री आल्या. त्यांनी मला मारहाण केली. माझ्या पोटात दुखतंय, त्रास होतोय….

‘मी वैयक्तिक बोलले नाही’

रोशनी शिंदे पुढे म्हणाल्या, ‘ त्या पोस्टमध्ये काही नव्हतं. पोस्ट राजकीय होती पण वैयक्तिक महिलेवर हल्ला करणं योग्य नाही. मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. तरीही तुम्ही आमच्या वहिनींनाच बोलले, असं त्यांना वाटलं. मी फक्त साहेब म्हणाले. आज यांचे १० साहेब आहेत. कोणते साहेब, कोणत्या वहिनी हे तेच ठरवणार. मी कुणाला उद्देशून बोलले नाही. मला धमक्यांचे कॉल येत होते. तेव्हा मी माफी मागितली. कुणाची भावना दुखावली गेली असेल तर सॉरी म्हटले दुपारी साडे ३ वाजता… तरीही संध्याकाळी पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले आदी भरपूर महिला होत्या. माझ्या पोटात मारलं.. याचं सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिसांनी त्यांना जाब विचारला नाही. राजकारणाशी संबंधित तुम्ही टाकलं तर आम्ही तसं उत्तर दिलं. वैयक्तिक हल्ले का केले जातायत? आम्ही साधी पोस्ट टाकली तर तुम्ही केसेस दाखल करत आहात. हुकुमशाही हा प्रकार ठाण्यातच का? मुख्यमंत्री ठाण्याचेच आहेत म्हणून असे प्रकार सुरु आहेत का, असा सवाल रोशनी शिंदे यांनी विचारला.

राजकारण तापलं, ठाकरे कुटुंबीय भेट देणार

ठाण्यातील या प्रकरणानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे हे रोशनी शिंदे यांची लवकरच भेट घेणार आहेत. संजय राऊत तसेच सुषमा अंधारे यांनीदेखील ठाण्यातील राड्यावर आक्रमक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही दडपशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज सकाळीच एक बैठक ठाण्यातील आनंदाश्रमात घेतली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.