Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल […]

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 2:24 PM

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पूल धोकादायक झाला असल्याने ग्रामस्थांनी नव्याने बांधण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार पुलाच्या डागडुजीसाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र डागडुजीला सुरुवात झाली नसल्याने पुलाचा काही भाग आज खचला आहे. या पुलावर मोठा खड्डा पडल्याने या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली असून पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पुलावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या पूलाचे कठडे कोसळण्याची घटना घडली होता. यावर्षी पूलाचा काही भागच खचला असून पूलाला भगदाड पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पूलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला असून तो पावसात कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मलंगगड परिसरात असलेल्या चिरड, शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाला आहे.

हे सुद्धा वाचा
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.