Barvi Dam : ‘बारवी’च्या 627 प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या, विविध महापालिकांमध्ये शिक्षणानुसार नोकऱ्या

प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकऱ्या देण्यात येणार असून गट की आणि ड मध्ये या नोकऱ्या असतील. या प्रकल्पग्रस्तांमध्ये अनेक इंजिनिअर, बीएड केलेल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन आणि सरकारी नोकरी सुद्धा देण्यात आल्यानं आमदारांसह प्रकल्पग्रस्तांनीही एमआयडीसीचे आभार मानले आहेत.

Barvi Dam : 'बारवी'च्या 627 प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या, विविध महापालिकांमध्ये शिक्षणानुसार नोकऱ्या
'बारवी'च्या 627 प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्याImage Credit source: GOOGLE
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 2:55 AM

बदलापूर : बदलापूरच्या बारवी धरणातील 627 प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या (Government Job) मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या विविध महानगरपालिका (Mahapalika) आणि नगरपालिकां (Nagarpalika)मध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार या नोकऱ्या मिळणार आहेत. याबाबत एमआयडीसीनं महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रमुखांना पत्रं पाठवली असून त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातून बाधितांना नोकऱ्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बारवी धरणात विस्थापित झालेल्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला या सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकऱ्या देण्यात येणार असून गट की आणि ड मध्ये या नोकऱ्या असतील. या प्रकल्पग्रस्तांमध्ये अनेक इंजिनिअर, बीएड केलेल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन आणि सरकारी नोकरी सुद्धा देण्यात आल्यानं आमदारांसह प्रकल्पग्रस्तांनीही एमआयडीसीचे आभार मानले आहेत.

एमआयडीसीने 209 बाधितांना स्वतःकडे नोकरी दिली

बदलापूरच्या बारवी धरणाची उंची 2018 साली 4 मीटरने वाढवण्यात आली. यावेळी धरणाचं पाणलोट क्षेत्र वाढल्यानं 1203 कुटुंब विस्थापित झाली. या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासोबतच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याबाबतचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 18 सप्टेंबर 2017 रोजी काढला होता. याच जीआरच्या अनुषंगाने बारवी धरणाची मालकी असलेल्या एमआयडीसीने 209 बाधितांना स्वतःकडे नोकरी दिली. तर उर्वरित 418 जणांना नोकरी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका आणि नगरपालिकांना एमआयडीसीने पत्रं पाठवली आहेत.

त्यानुसार ठाणे महानगरपालिकेत 29, नवी मुंबई महानगरपालिकेत 68, मीरा भाईंदर महानगरपालिकेत 97, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक 121, उल्हासनगर महानगरपालिकेत 34, अंबरनाथ नगरपरिषदेत 16, बदलापूर नगरपरिषदेत 18 आणि एमआयडीसीत 35 जणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारवी प्रकल्पग्रस्तांसाठी विहित केलेलं 5 टक्के आणि भूकंपग्रस्तांसाठी विहित करण्यात आलेलं 2 टक्के असं एकूण 7 टक्के आरक्षण वापरण्यात येणार आहे. (The 627 project affected people of Barvi Dam will get jobs in various Municipal Corporations according to their education)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.