दिवसाढवळ्या चोरी, पोलिसांचा धाक राहिला नाही का?, ट्रकमध्ये साहित्य भरले आणि…

मोहने शहाड रोडनजीक जलकुंभाच्या जवळ मोठे पाण्याचे पाईप ठेवले आहेत. हे पाईप दोन ट्रकमध्ये एक क्रेनच्या सहाय्याने भरुन नेत असल्याचा प्रकार जवळच्या नागरिकांच्या लक्षात आला.

दिवसाढवळ्या चोरी, पोलिसांचा धाक राहिला नाही का?, ट्रकमध्ये साहित्य भरले आणि...
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 7:33 PM

ठाणे : केडीएमसी हद्दीत पाणी पुरवठा प्रकल्पांची कामे सुरु आहे. त्यासाठी पाईल लाईन मागविल्या जातात. या पाईपची देखरेख करण्यासाठी महापालिकेनं सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे शहाड येथील जलकुंभानजीक ठेवलेले तीन टनाचे तीन पाईप चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला. मोहने शहाड रोडनजीक जलकुंभाच्या जवळ मोठे पाण्याचे पाईप ठेवले आहेत. हे पाईप दोन ट्रकमध्ये एक क्रेनच्या सहाय्याने भरुन नेत असल्याचा प्रकार जवळच्या नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवित हा चोरीचा प्रकार असू शकतो, अशी शंका व्यक्त करत याबाबत पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच खडकपाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सज्रेराव पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी चौकशी सुरू केली. ट्रकमध्ये पाईप भरुन नेत असलेल्या ट्रक चालकासह क्रेन चालकाला पोलिसांनी विचारणा केली. याची माहिती महानगरपालिकेला दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकरणाचा उघड झाला.

हे सुद्धा वाचा

तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले

महानगरपालिकेने सध्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. खडकपाडा पोलीस या तिन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे. असे तपास अधिकारी शरद झिने यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवली महापालिकेचे १७ फूट लांबीचे १४०० मिलीमीटर व्यासाचे ३ टनाचे ३ मोठे पाण्याचे पाईल चोरी करण्याचा प्रकार दिवसाढवळ्या उघडकीस आला आहे.

दोन ट्रक, एक क्रेन चालक ताब्यात

नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणी घटनास्थळी खडकपाडा पोलिसांनी धाव घेत कैलास लक्ष्मण हाकेकर, राजेश धर्मराज यादव, जयराम रामाप्रसाद जैयस्वाल नावाच्या २ ट्रक आणि १ क्रेन चालक ताब्यात घेतले.

चोरी दिवसाढवळ्या केली जात होती. चोरट्यांना पोलिसांचे भय राहिले की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या घटनेत नागरिक सतर्क होते. त्यामुळे चोरट्यांचा डाव उधळून लावण्यात आला. अन्यथा महापालिकेचे साहित्य चोरीला गेले असते. पोलिसांनी योग्य वेळी घटनास्थळ गाठले आणि चोरी उघडकीस आली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.