AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangali Murder : सांगलीत गुप्त धन काढण्यासाठी एकाचा खून, तब्बल चार महिन्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी केला यशस्वी उलगडा

मयत अवधूत शिंदे या तरुणाने गुप्त धन काढून देतो म्हणून काही लोकांकडून पैसे व सोने घेतले होते. पण गुप्त धन न दिल्याने त्याने पैसे परत द्यावे म्हणून आरोपींनी मयत अवधूतला मारहाण केली आणि यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयत अवधूतला नागज घाटात फेकून दिले आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

Sangali Murder : सांगलीत गुप्त धन काढण्यासाठी एकाचा खून, तब्बल चार महिन्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी केला यशस्वी उलगडा
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 11:56 PM
Share

सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये गुप्त धन काढून देतो म्हणून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. या कारणाने अवधूत सोपान शिंदे (Avdhoot Sopan Shinde) या तरुणाचा सहा जणांनी खून (Murder) करून अवधूतचे प्रेत घाटामध्ये टाकून पुरावा नष्ट केला होता. हा खून उघड करण्याचे कवठेमहांकाळ पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा खून उघडकीस आणून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या दरम्यान आंबवडे नागज ते विटा रस्त्यावरील नागज घाटात वनविभागच्या जागेमध्ये अवधूत सोपान शिंदे याचे प्रेत पोलिसांना मिळाले होते. पण मयताच्या नातेवाईकांनी खूनाचा संशय कवठेमहांकाळ पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनाही हा खुनच असावा असा संशय निर्माण झाला आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी या खुनाचा उलघडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची टीम रवाना केली. (The murder of four months ago in Sangli was solved by the police)

आनंदराव आत्माराम पाटील (57 रा. पाडळी ता. तासगाव ), तुषार बाळू कुंभार (28 रा. घोटीखुर्द ता. तासगाव ), लखन ठोंबरे (रा. पंचशील नगर, विटा ), वैभव नेताजी सकट (रा. आंबवडे ता. खटाव ), अमोल विठ्ठल कारंडे (22, रा. आंबवडे, ता तासगाव) व अण्णा या सहा जणांवर आपसात संगमनत करून अवधूत शिंदे याला काठी, लोखंडी पाईपने मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी डोक्यात मारले. त्यामुळे अवधूत जागीच ठार झाला.

मयताने गुप्त धन देतो सांगून लोकांकडून पैसे आणि सोने घेतले होते

मयत अवधूत शिंदे या तरुणाने गुप्त धन काढून देतो म्हणून काही लोकांकडून पैसे व सोने घेतले होते. पण गुप्त धन न दिल्याने त्याने पैसे परत द्यावे म्हणून आरोपींनी मयत अवधूतला मारहाण केली आणि यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयत अवधूतला नागज घाटात फेकून दिले आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर तिघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. (The murder of four months ago in Sangli was solved by the police)

इतर बातम्या

Kalyan Crime : अखेर ‘त्या’ शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल, जमिनीच्या प्रकरणात शेतकरी कुटुंबाला केली होती मारहाण

Ahmedabad Bombblast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल; 49 दोषी, 28 जणांची निर्दोष सुटका

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.