Police Transfer : राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृहखात्याकडून काढण्यात आले आदेश; ठाण्यातील 4 अधिकाऱ्यांचा समावेश

IPS Transfers : ठाणे आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची यापूर्वीच महाराष्ट गुप्तवार्ता अकादमीमध्ये बदली झाली आहे. आता पवार यांच्या जागी महामार्ग सुरक्षा पथकाचे (पुणे) अधीक्षक संजय जाधव यांची बढतीवर बदली झाली आहे.

Police Transfer : राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  गृहखात्याकडून काढण्यात आले आदेश; ठाण्यातील 4 अधिकाऱ्यांचा समावेश
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:50 AM

ठाणे: महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) (Indian Police Service) उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (Order from the Home Department) बुधवारी गृहखात्याकडून काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ठाण्यातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची मुंबईत संरक्षण व सुरक्षा विभागात तर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.  शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी हे आदेश बुधवारी काढले असून बदलीच्या ठिकाणी सर्व अधिकारी गुरुवारी हजर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  1. चार उपायुक्तांकडे अधीक्षकपदाची धुरा
  2. मीरा-भाईंदर, वसई-विवार पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त महेश पाटील यांना आयुक्तपदी बढती
  3. महेश पाटील यांची नियुक्ती मुंबई वाहतूक विभागात
  4. संजय जाधव यांना अपर पोलीस आयुक्तपदी बधती
  5. दत्तात्रय शिंदे यांना अपर पोलीस आयुक्तपदी बधती
  6. पंजाबराव उगले आता ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून कामकरणार
  7. राजेंद्र मोने यांची सोलापूर आयुक्तपदी नियुक्ती
  8. अनिल कुंभारे यांची मुंबई आयुक्तालयातील संरक्षण आणि सुरक्षा विभागात नियुक्ती
  9. अक्षय शिंदे यांची जालना जिल्हा अधीक्षकपदी नियुक्ती
  10. अतुल कुलकर्णी यांची धाराशीवच्या अधीक्षकपदी नियुक्ती
  11. नंदकुमार ठाकूर बीडचे अधीक्षक
  12. बाळासाहेब पाटील पालघरचे अधीक्षक

डॉ. पंजाब उगले पोलीस उपमहानिरीक्षक

ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाण्याचे अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांची बदली झाली आहे. उगले यांना पोलीस उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Police Dr. Punjab sprang) दर्जाच्या ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.

संजय जाधव यांच्याकडे ठाणे प्रशासन

ठाणे आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची यापूर्वीच महाराष्ट गुप्तवार्ता अकादमीमध्ये बदली झाली आहे. आता पवार यांच्या जागी महामार्ग सुरक्षा पथकाचे (पुणे) अधीक्षक संजय जाधव यांची बढतीवर बदली झाली आहे. त्यामुळे जाधव यांच्याकडे लवकरच ठाणे प्रशासन विभागाची सूत्रे येणार आहेत.

 दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर

ठाण्याच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर ठाण्याच्या सह पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यामुळे कराळे यांचे पद रिक्त झाले होते. आता त्याजागी ठाणे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पालघरचे अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे.

तिन्ही अतिरिक्त आयुक्त बढतीवर

ठाण्याला मिळालेले तिन्ही अतिरिक्त आयुक्त हे बढतीवर नव्यानेच दाखल होणार आहेत. त्यामुळे डॉ. पंजाब उगले, दत्तात्रय शिंदे आणि संजय जाधव या तिघांनाही अतिरिक्त आयुक्त पदाची पदोन्नती ही प्रथम ठाण्यात मिळाली आहे. शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी हे आदेश बुधवारी काढले असून बदलीच्या ठिकाणी सर्व अधिकारी गुरुवारी हजर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.