Ulhasnagar Crime : जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या, उल्हासनगर क्राईम ब्रॅंचची सापळा रचून कारवाई

आरोपी 27 नोव्हेंबर 1999 रोजी फर्लोच्या सुट्टीवर बाहेर आला होता. मात्र सुट्टी संपल्यानंतरही तो जेलमध्ये परतलाच नाही. तेव्हापासून फरार असलेला रमेश हा उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागातील भरत नगरमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचला मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रॅंचनं सापळा रचून रमेश तायडे याला अटक केली.

Ulhasnagar Crime : जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या, उल्हासनगर क्राईम ब्रॅंचची सापळा रचून कारवाई
जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 4:38 PM

उल्हासनगर : उल्हासनगर : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप (Life-Imprisonment) भोगत असताना फर्लोच्या सुट्टीवर जेलबाहेर येऊन फरार (Wanted) झालेल्या एका कैद्या (Prisoner)ला तब्बल 23 वर्षांनी बेड्या ठोकण्यात आल्यात. उल्हासनगर क्राईम ब्रॅंचने सापळा रचून ही कारवाई केली. रमेश उर्फ दिनेश तायडे असं या अटक करण्यात आलेल्या 53 वर्षीय कैद्याचं नाव आहे. रमेश याने 1995 साली गुजरातमध्ये त्याच्या पत्नीला जाळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी सूरत जिल्ह्यातील लिंबायत पोलीस ठाण्यात त्याच्यावर हुंडाबळी आणि खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तो बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता. (Ulhasnagar Crime Branch traps fugitive arrested after 23 years)

फर्लो रजेवर आल्यानंतर फरार झाला होता

आरोपी 27 नोव्हेंबर 1999 रोजी फर्लोच्या सुट्टीवर बाहेर आला होता. मात्र सुट्टी संपल्यानंतरही तो जेलमध्ये परतलाच नाही. तेव्हापासून फरार असलेला रमेश हा उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागातील भरत नगरमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचला मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रॅंचनं सापळा रचून रमेश तायडे याला अटक केली. त्याला आता पुन्हा एकदा गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून त्याची रवानगी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा एकदा जेलमध्ये केली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.

नालासोपाऱ्यात गोळीबार: कौटुंबिक वादातून फायरिंग

नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरात रविवारी रात्री 10 वाजता गोळीबार झाला असून, सख्या मेहुण्याने आपल्या भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्याची घटना घडली आहे. यात भावोजी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक कारणावरून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हितेन जोशी असे जखमी भावोजीचे नाव असून, दीपक गौतम असे आरोपीचे नाव आहे. जखमी आणि आरोपी हे एकमेकांचे मेव्हणा आणि भावोजी आहेत. कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्व संतोष भुवन शर्मा वाडी या परिसरात दोघे जण पायी चालत येऊन फायरिंग करून फरार झाले आहेत. (Ulhasnagar Crime Branch traps fugitive arrested after 23 years)

इतर बातम्या

4 कोटी 20 लाखांच्या हवालाच्या पैशांचा तपास ईडीकडे? नागपूर पोलिसांचं पत्र

Nagpur Crime : नागपूरमध्ये गोंडवाना एक्स्प्रेसमधून 42 किलो गांजा जप्त

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.