वरातीत नाचण्याची हौस भारी पडली, नाचता नाचता थेट रुग्णालयात पोहचले, काय घडलं नेमकं?

हॉटेलमध्ये एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नासाठी नवरदेव वरात घेऊन लग्नस्थळी दाखल झाला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये वऱ्हाडी नाचत होते. पण अचानक या उत्साहावर पाणी फेरले.

वरातीत नाचण्याची हौस भारी पडली, नाचता नाचता थेट रुग्णालयात पोहचले, काय घडलं नेमकं?
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 12 वऱ्हाड्यांना चिरडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 3:41 PM

निनाद करमरकर, TV9 मराठी, उल्हासनगर : लग्नाच्या वरातीत नाचण्याची हौस काही वऱ्हाड्यांना चांगलीच महागात पडली आहे. उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात घडली आहे. जखमींपैकी 8 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले, तर तिघांवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर गाडी जप्त केली असून चालकालाही अटक केली आहे.

ऑटोमॅटिक कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

रोहित धरमपाल रिझवानी याचे उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी लग्न होते. या लग्नाचं वऱ्हाड हॉटेलजवळ आले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये वऱ्हाडी नाचत होते. यावेळी पुढे वऱ्हाडी नाचत होते, तर नवरदेव मागे थार गाडीत बसला होता. यादरम्यान नवरदेवाच्या थार गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट वऱ्हाड्यांच्या अंगावर आली. यामध्ये 12 वऱ्हाडी चिरडले गेले. या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे 8 जणांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलं. तर तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आलंय.

कार ऑटोमॅटिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

ज्या कारने वऱ्हाड्यांना चिरडलं, ती थार गाडी ऑटोमॅटिक असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटले आणि दुर्दैवी ही घटना घडली. या घटनेमुळे ऐन लग्न समारंभात शोककळा पसरली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत गाडी जप्त केली असून, चालकालाही अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.