नालासोपारा लसीकरण केंद्रात लसीकरणाच्या रांगेत चक्कर, पुढच्या क्षणातचं सर्व संपलं
वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. Vasai Virar corona vaccination center
वसई : वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या एका 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला आहे. नालासोपारा पश्चिम पाटणकर पार्क येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रावर सकाळी सव्वा नऊ वाजता ही घटना घडली आहे. हरिष पांचाल असं मृत्यू झालेल्या वृध्दाचं नाव आहे. ह्रदयविकाराच्या झटक्यानं हरिष पांचाल यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकारऱ्यांनी दिली. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी लसीकरण केंद्रातील गैरसोयीवर बोट ठेवलं आहे. (Vasai Virar Harish Panchal died at corona vaccination center)
पाटणकर परिसरात राहणारे हरीश्भाई पांचाळ परिसरातील महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गेले होते. त्यांना लसीकरणाची माहिती हवी होती यासाठी ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. त्यावेळी अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना जवळच्या पालिका रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हरिष पांचाळ यांना आधीच मधुमेहाचा त्रास होता. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी पॅनिक होऊ नये
सर्व आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी कुठेही पॅनिक होऊ नये सर्वांनी कोव्हीड 19 ची लस घायची आहे, अशी माहिती वसई विरारच्या महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितलं आहे.
लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
लसीकरण केंद्रात जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत असून ती सुधारण्यात यावी, असे पत्र सामाजिक कार्यकर्त्याने महापालिका आयुक्तांना दिले होते. तरीही ही सुधारणा तात्काळ झाली नसल्याने एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
बॉस, ताई, दादा, बाबा, महाराष्ट्र पोलिसांचा फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांना इशाराhttps://t.co/87gS6Kx4KT#Maharashtra | #MahrashtraPolice | #numberplate | @DGPMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2021
संबंधित बातम्या:
मधुमेह असणाऱ्या रुग्णांचा कोरोना लसीमुळे मृत्यू होतो? वाचा व्हायरल मेसेज मागचं सत्य
(Vasai Virar Harish Panchal died at corona vaccination center)