उल्हासनगरात विधवा महिलेवर कात्रीने वार; प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून हल्ला; हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद
वाद विकोपाला जाऊनच दयानंदने सोमवारी सकाळी पीडित महिला काम करत असलेल्या कारखान्यात जाऊन तिच्यावर कात्रीने वार केले. त्यामुळे महिलेच्या पाठीवर जखम झाली आहे.
उल्हासनगर: उल्हासनगरात (Ulhasnagar Crime) एका विधवा महिलेवर प्रेमसंबंधातून कात्रीने हल्ला (Attack) केल्याची घटना कपडे शिवण्याच्या कारखान्यात घडली आहे. कॅम्पमधील गाऊन मार्केटमध्ये (Gown Market at Camp) घडलेली ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आ्हे. विधवा महिलेचे गेल्या काही दिवसांपासून दयानंदबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र मागील काही दिवसांपूर्वी महिलेचे आणि दयानंदचे वाद झाले. त्यांच्यात वाद झाल्यानंतरही दयानंदन प्रेमसंबंध ठेवण्याचा दयानंदने तगादा लावला होता. त्याच्या या तगाद्यामुळे त्याला नकाल दिल्याने त्यांच्याच वाद झाला.
कामगारांमुळे जीव वाचला
त्यामुळे त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाले. वाद विकोपाला जाऊनच दयानंदने सोमवारी सकाळी पीडित महिला काम करत असलेल्या कारखान्यात जाऊन तिच्यावर कात्रीने वार केले. त्यामुळे महिलेच्या पाठीवर जखम झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तेथे काम करणारे कामगार महिलेच्या मदतीला धाऊन आल्याने तिचा जीव वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
प्रेमसंबंधातून हल्ला
उल्हासनगरमधील कॅम्प 5 मधील गाऊन मार्केटमध्ये कपडे शिवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामध्येच विधवा महिला काम करते. या कारखान्यात काम करताना या महिलेचे दयानंद फुगारे या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. मात्र काही कारणांवरून या महिलेनं दयानंद सोबत असलेले प्रेमसंबंध तोडले होते. त्यांच्या वाद झाल्यानंतर विधवा महिलेने दयानंदनबरोबर असलेले संबंध तोडले होते.
प्रेमसंबंधासाठी तगादा
त्यामुळे त्यानंतरही दयानंदने या महिलेशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला होता. मात्र पीडितेनं त्याला नकार दिल्यानं त्यांच्यातील वाद विकोपाल गेला. या वादातूनच दयानंद याने सोमवारी सकाळी पीडित महिला काम करत असलेल्या कारखान्यात जाऊन तिच्यावर कात्रीने वार केले.
महिलेच्या पाठीला दुखापत
दयानंद फुगारे याने विधवा महिलेवर हल्ला केल्यानंतर पिडीत महिलेच्या पाठीला दुखापत होऊन ती खाली पडली. यावेळी कारखान्यातल्या इतर कामगारांनी मध्यस्ती करुन त्या पीडित महिलेला वाचवले आहे. यावेळी कामगारांनी दयानंद याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या तावडीतून निसटून पसार झाला.