Ambernath Crime : अंबरनाथमध्ये महिलेवर सहकाऱ्याकडून लैंगिक अत्याचार, महिलेचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

अंबरनाथ पश्चिमेला राहणारी 30 वर्षीय पीडित महिला ही मूळची सातारा जिल्ह्यातली असून पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दोन मुलांना गावी ठेवून नोकरी करण्यासाठी ती अंबरनाथमध्ये आली. यानंतर तिच्या नातेवाईकाच्या ओळखीने तिला अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील विदुषी वायर्स या कंपनीत नोकरी लागली. या कंपनीत काम करत असताना तिथे काम करणाऱ्या अब्दुल शेख या तरुणासोबत तिची मैत्री झाली.

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये महिलेवर सहकाऱ्याकडून लैंगिक अत्याचार, महिलेचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
अंबरनाथमध्ये महिलेवर सहकाऱ्याकडून लैंगिक अत्याचारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:29 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका घटस्फोटित महिलेवर तिच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याने या महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. महिलेला उपचारासाठी रुग्णायात दाखल करण्यात आले. यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात घाईघाईने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तब्बल 10 दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक (Arrest) करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आरोपींना लवकरात लवकर पकडून मला न्याय मिळवून देण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे. अब्दुल शेख असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे लैंगिक शोषण केले

अंबरनाथ पश्चिमेला राहणारी 30 वर्षीय पीडित महिला ही मूळची सातारा जिल्ह्यातली असून पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दोन मुलांना गावी ठेवून नोकरी करण्यासाठी ती अंबरनाथमध्ये आली. यानंतर तिच्या नातेवाईकाच्या ओळखीने तिला अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील विदुषी वायर्स या कंपनीत नोकरी लागली. या कंपनीत काम करत असताना तिथे काम करणाऱ्या अब्दुल शेख या तरुणासोबत तिची मैत्री झाली. अब्दुल याने तिला लग्नाचं आमिष दाखवत 2020 ते 2022 पर्यंत अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र पीडित महिलेने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावताच तो टाळाटाळ करू लागला आणि त्याच्या वर्तणुकीत बदल झाला. त्यानंतर त्याने कंपनीच्या मालकाला आपल्याबद्दल चुकीची माहिती देत आपल्याला कामावरून काढून टाकायला लावलं, असा पीडित महिलेचा आरोप आहे.

तीन महिने पोलीस ठाण्याच चकरा मारुनही आरोपीवर कारवाई नाही

याप्रकरणी पीडित महिला ही गेल्या 3 महिन्यांपासून सातत्याने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अब्दुल शेख याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी चकरा मारत होती. मात्र कुणीही तिची बाजू ऐकून घेतली नाही. उलट ही बाब तिच्या कंपनीचा मालक साकेत बगारिया उर्फ गुड्डू शेठ याला समजताच त्याने संबंधित महिलेच्या नातेवाईकांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आणि अब्दुल याच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला, असा पीडित महिलेचा आरोप आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवूनही अधिकारी दाद देत नसल्याने पिडीत महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केले. त्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने 31 मे 2022 रोजी तिला बोलावून घेत तिची स्टेटमेंट घेतली.

हे सुद्धा वाचा

मात्र ही स्टेटमेंट आपल्या सांगण्याप्रमाणे नव्हे, तर पोलिसांच्या मनाप्रमाणे लिहिल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. त्यामुळे पीडित महिलेने गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करत आणि त्याच दिवशी रात्री घाईघाईने अब्दुल शेख याच्याविरोधात बलात्काराचा, तर कंपनीचा मालक साकेत बगारिया उर्फ गुड्डू शेठ याच्याविरोधात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होऊन आता 10 दिवस झाले असले, तरीही अंबरनाथ पोलिसांना हे दोन्ही आरोपी सापडलेले नाहीत.

लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे पोलिसांचे आश्वासन

या सगळ्याबाबत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना विचारलं असता, या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरात लवकर दोन्ही आरोपींना अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीपासूनच योग्य प्रकारे सहकार्य न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तर काही अधिकाऱ्यांनी अतिशय चुकीची वागणूक दिल्याचाही तिचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस आरोपींना कधी पकडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Woman sexually assaulted by a colleague in Ambernath, attempts suicide by drinking phenyl)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.