तुम्ही चोर आहात, आमची मशाल चोरली; समता पार्टीचा हल्लाबोल

मशाल चिन्ह फक्त अंधेरी विधानसभेसाठी दिलं गेलं. शिवसेनेचा विषयही संपला आहे. ज्यांचं चिन्ह त्यांना मिळालं आमच्या चिन्हाला का अडकवण्यात आलं, असा आरोपही उदय मंडल यांनी केला.

तुम्ही चोर आहात, आमची मशाल चोरली; समता पार्टीचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 4:49 PM

ठाणे : उद्धव ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागत असल्याचं दिसून येतंय. समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा करत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याबाबत बोलताना समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे. ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाने चोरी केल्याचा आरोप केला. मशाल चिन्ह आम्हाला मिळावं, यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तीच खरी शिवसेना आहे. जे आता मशाल, मशाल करत आहेत ती समता पार्टीचे मशाल आहे ती त्यांची नाही. ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय की धनुष्यबाण चोरीला गेला. प्रत्यक्षात ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं.

चिन्हासाठी कुणी फूस लावली?

उलट उद्धव ठाकरे गट चोर आहे. त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरी केलं. आज त्यांचं अहंकार उध्वस्त झालाय. शिवसेनेतील अंतर्गत वादावर आता तोडगा निघालाय. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालंय. त्यामुळे मशाल चिन्ह हे समता पार्टीचे आहे. ते आम्हाला मिळावं यासाठी याचिका दाखल केल्याचं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी सांगितलं. ठाकरे गटाकडून समता पार्टीला फूस असल्याचा आरोप करण्यात येतोय. अनिल देसाई यांनी मशाल चिन्हासाठी कुणी फूस लावली, असा आरोप केला होता. याबाबत बोलताना उदय मंडल यांनी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना डी रजिस्टर आणि डी रेकग्नाइज त्याच्यातला अर्थ कळत नाही. त्यांना खासदार कुणी बनवलं. उद्धव ठाकरे यांनी जी गँग बनवली आहे, ती अशिक्षित लोकांची टोळी आहे.

आमचं मशाल चिन्ह का अडवलं?

अनिल देसाई किंवा संजय राऊत हे सगळे एकच भाषा बोलतात. जोपर्यंत मशाल त्यांच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालंय. चोर तुम्ही आहात तुम्ही आमची मशाल चोरली असा पलटवार समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडळ यांनी ठाकरे गटावर केला. त्यामुळं आधीच अडचणीत असलेल्या ठाकरे गटाला हा आणखी एक धक्का मानला जात आहे. चोर जोराने बोलतो. तो दुसऱ्याला चोर समजतो. अहंकार जळून खाक झाला. मशाल चिन्ह फक्त अंधेरी विधानसभेसाठी दिलं गेलं. शिवसेनेचा विषयही संपला आहे. ज्यांचं चिन्ह त्यांना मिळालं आमच्या चिन्हाला का अडकवण्यात आलं, असा आरोपही उदय मंडल यांनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.