Ambernath Youth Death : अंबरनाथमध्ये ‘बटन’ गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

आमिरला गेल्या काही दिवसांपासून सोल्युशन आणि बटन या नशेचं व्यसन लागलं होतं. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्यानं बटनच्या गोळ्यांचं अतिसेवन केल्यानं त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं तीन दिवस उपचार केल्यानंतर अखेर मंगळवारी संध्याकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्यानं त्याचं निधन झालं.

Ambernath Youth Death : अंबरनाथमध्ये 'बटन' गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू
अंबरनाथमध्ये 'बटन' गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:33 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये ‘बटन’ नामक नशेच्या गोळ्यांचं अतिसेवन (Overdose) केल्यानं एका 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. आमिर मेहबूब शेख उर्फ लाला (18) असे मयत तरुणाचे नाव आहे. यानंतर या गोळ्या आणि सोल्युशनची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनवणी या तरुणाच्या आईनं केलीय आहे. तर अशी विक्री आढळल्यास कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलंय. अंबरनाथ पश्चिमेच्या सिद्धार्थ नगर आणि भगत सिंग नगर परिसरात ही विक्री सर्रासपणे होत असल्याची माहितीही त्यांनी दिलीये.(Youth dies of overdose of button pills in Ambernath)

गोळ्यांच्या अतिसेवनामुळे अवयव निकामी होऊन मृत्यू

अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात आमिर मेहबूब शेख उर्फ लाला हा तरुण वास्तव्याला होता. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आमिरच्या घरी आई-वडिल, दोन भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या आमिरला गेल्या काही दिवसांपासून सोल्युशन आणि बटन या नशेचं व्यसन लागलं होतं. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्यानं बटनच्या गोळ्यांचं अतिसेवन केल्यानं त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं तीन दिवस उपचार केल्यानंतर अखेर मंगळवारी संध्याकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्यानं त्याचं निधन झालं. तरुण मुलाच्या अशा अकाली निधनानं त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय. यानंतर नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या या बटन गोळ्या आणि सोल्युशन यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी मृत आमिरच्या कुटुंबीयांनी केली आहे.

या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांना प्रतिक्रिया विचारली असता, पोलीस ठाण्यात अद्याप अशी नोंद नसून डॉक्टरांनी आमिरचा मृत्यू हा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्यामुळे झाल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा नशेच्या पदार्थांची विक्री होत असेल, तर त्यावर कारवाई करू, असं अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितलं आहे.

काय आहेत बटन गोळ्या ?

दरम्यान, या बटनच्या गोळ्या म्हणजे नेमकं काय असतं? याची आम्ही डॉक्टरांकडून माहिती घेतली. अंबरनाथमधील डॉक्टर झुबेर शाह यांच्या म्हणण्यानुसार बटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या असतात. मात्र या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जाऊ शकत नाहीत. हे शेड्यूल्ड ड्रग असल्यानं त्याची विक्री किंवा साठा करण्यावरही निर्बंध आहेत, असं डॉक्टर झुबेर शाह म्हणाले. तसंच या गोळ्यांच्या सर्रास विक्रीवर पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

बटन, सोल्युशन, व्हाईटनर, थिनर या नशा कुठेही सहज आणि स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळं रस्त्यावर, प्लॅटफॉर्मवर फिरणारी मुलं सुद्धा आपल्याला रुमाल तोंडाला लावून सतत काहीतरी हुंगताना दिसतात. मात्र यामुळं काही काळानं शरीराची मोठी हानी होते आणि मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळं येणाऱ्या पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवायचं असेल, तर यावर वेळीच कठोर कारवाई गरजेची आहे. (Youth dies of overdose of button pills in Ambernath)

इतर बातम्या

धक्कादायक | औरंगाबादेत कुरिअरने आला शस्त्रसाठा, तब्बल 37 तलवारी, एक कुकरी जप्त, पोलिसांचा तपास सुरू

Sanjay Pande On Drugfree Mumbai : मुंबईला ड्रग्जमुक्त कसं करणार? पोलीस आयुक्त पांडेंनी फॉर्म्युला सांगितला

महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.