Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2010 चे ते प्रकरण, मॅडम कमिशनर यांचा आरोप, अजित दादांकडे संशयाची सुई

मी सांगूनही त्या मंत्र्यानी माझं काही ऐकलं नाही. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मात्र, मी त्याला नकार दिला. पुढे, ही लिलाव प्रक्रियाच रखडली. त्यामुळे प्रत्यक्ष लिलाव झाला नाही असेही मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात नमूद केलंय.

2010 चे ते प्रकरण, मॅडम कमिशनर यांचा आरोप, अजित दादांकडे संशयाची सुई
MEERA BORVANKAR AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 10:40 PM

पुणे : 15 ऑक्टोबर 2023 | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुण्याचेच माजी पालकमंत्री अजितदादा यांच्यावर मोठा आरोप केलाय. यामुळे अजितदादा पुन्हा वादाच्या गर्त्तेत सापडले आहेत. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होऊन एक आठवडा सुद्धा झाला नाही. तोच हा नवा वाद सुरु झाला. हे प्रकरण २०१० सालातलं आहे. ज्यात अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आलाय. मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधून अजित पवार यांना टार्गेट करण्यात आले आहे.

येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भात

मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये मीरा बोरवणकर म्हणतात, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मी अनेक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भात काही विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं.

विभागीय आयुक्तांच्या संभाषणानुसार विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी.

हे सुद्धा वाचा

माझ्याकडे चुकीच्या नजरेनं….

“मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज आहे. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशातच सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल, असे त्यांना सांगितल्याचे या पुस्तकात म्हटलं आहे.

जमीन लिलावाचे अधिकार पालकमंत्र्यांना

मीरा बोरवणकर यांच्या याच प्रकरणावरून अजित पवार यांच्याभोवती संशयाचे जाळे निर्माण झालेय. त्यामुळेच आता २०१० च्या त्या प्रसंगावरुन वर्तमानातलं राजकारण तापलंय. अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. जमीन लिलावाचे अधिकार कधीच पालकमंत्र्यांना नसतात. कोणत्याही जमिनीचा लिलाव करायचा असेल तर महसूल विभाग त्यांची विनंती करतं आणि नंतर मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं, असं म्हणत अजित पवारांनी बोरवणकर यांचे आरोप फेटाळून लावलेत.

दुसरीकडे बोरवणकर यांनीही आपल्या पुस्तकात सारे आरोप स्पष्ट लिहिले असले तरी अजित पवार असा कुठेही उल्लेख केलेला नाही. येरवड्यातली पोलिसांची मोक्याची ३ एकर जागा एका बिल्डरला देण्याचा प्रयत्न मंत्र्यांनी केला असे त्यांनी लिहिले आहे. २०१० मध्ये अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होते. बोरवणकरांनी पुस्तकात फक्त दादा असा उल्लेख केलाय. त्यामुळे संशयाची सुई अजितदादा यांच्याकडेच वळतेय हे निश्चित.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.