AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : ओमिक्रॉन व्हेरिएंट आला असतानाच मोठी बातमी, एकाच कॉलेजमधील 281 विद्यार्थ्यांना कोरोना

नुकतीच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटन धास्ती वाढवली असताना कर्नाटकातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील धारवाढ येथे एकाच कॉलेजमधील 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एसडीएम मेडीकल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Corona : ओमिक्रॉन व्हेरिएंट आला असतानाच मोठी बातमी, एकाच कॉलेजमधील 281 विद्यार्थ्यांना कोरोना
corona
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 4:43 PM

कर्नाटक : नुकतीच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटन धास्ती वाढवली असताना कर्नाटकातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील धारवाढ येथे एकाच कॉलेजमधील 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एसडीएम मेडीकल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलंय

प्रशासनाची डोकेदुखी वाढली

यातील केवळ 6 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली असली, इतरांना लक्षणं नसली तरी अचानक झालेल्या वाढीनं खळबळ उडवून दिली आहे. कोरोना झालेल्यामध्ये विद्यार्थी शिक्षक कर्मचारी असा सर्वांचा समावेश आहे. शुक्रवारी एका दिवसात 99 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोड उडाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला असतानाच अचानक एवढी रुग्णवाढ म्हणजे दुष्काळात 13वा  महिना आल्यासरखे आहे.

अचानक रुग्ण कसे वाढले?

काही दिवसाआधीच कॉलेजमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याची माहिती समोर आल्याचं कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. सांस्कृतिक कार्यक्रमात गर्दी केल्यानेच ही रुग्णवाढ झाल्याचा अंदाज कर्नाटक सरकारकडून व्यक्त करण्यात आलाय. स्थानिक आरोग्य विभागापासून ते कर्नाटकचे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्रीही याप्रकरणी लक्ष देत आहेत. पण या रुग्णवाढीमुळे राज्यात कोणतीही निर्बंध लावणार नसल्याचं कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आलंय. याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. स्थानिक प्रशासनानं ताडतडीनं अजूनबाजूचा परिसर सॅनिटायझेशन करून घेतला आहे. तसेच अजूबाजूच्या शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आता खडबडून कामाला लागलं आहे. केरळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील रुग्णवाढ भविष्यात महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवणार का? हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

VIDEO: ज्या भेटीची राज्यात जोरदार चर्चा, त्याबाबत फडणवीस म्हणतात, भेट राजकीय नव्हतीच

IND vs NZ : अक्षर पटेलकडून न्यूझीलंडचा ‘पंच’नामा, किवी संघ 296 धावांत गारद, भारताला 49 धावांची आघाडी

आधी ओळखण्यासही नकार, आता महाठकासोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल! जॅकलिनच्या अडचणी वाढणार!

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.