Eknath Shinde: विधानभवनात ठाकरे सरकार बहुमतात असेल, शरद पवारांना विश्वास, पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक दिसली. ती अजित पवारांच्या परिचयाची आहेत असं वाटत नाही.पण माझ्या परिचयाची आहेत. उदा. सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष पाटील मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहे. त्यांचा सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा. आसाममध्ये राज्य सरकार व्यवस्था करण्यात एक्टिव्ह आहे, असे पवार म्हणाले आहेत.
मुंबई – महाविकास आघाडी सरकार (MVA Government) अल्पमतात आहे की नाही हे विधानसभा ठरवेल. विधासनभेत जेव्हा बहुमत सिद्ध करावे लागेल तेव्हा सर्व कळेल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी स्पष्ट केले आहे. अशी स्थिती अनेकदा पाहिली आहे. त्यातून मात करून हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे हे संबंध देशाला कळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) जे लोक गुवाहाटीत गेले. तिथल्या नेत्यांचं म्हणणं आहे की आघाडीमुळे आम्ही तिथे गेलो. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात त्यांची नाराजी आहे. त्यावर राऊत यांनी सांगितलंय की, तुम्हाला हेच सांगायचं असेल तर इथे येऊन सांगा. आम्ही तुमचं ऐकू आघाडीतून बाहेर पडू. आसाममध्ये बसून सांगू नका, असं राऊत म्हणाले. हेच काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
1. अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम काम केलं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, कोरोनाच्या राष्ट्रीय संकटावर मात करण्याचं काम केलं. हे सर्व पाहिल्यानंतर हा प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान आहे
2. ज्या पद्धतीने शिवसेना आमदारांना गुवाहाटीत नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ते आल्यावर सांगतील. इथे आल्यावर आपण सेनेसोबत आहोत. हे सांगतील. बहुमत शिवसेनेसोबत आहे. हे सिद्ध होईल.
3. सरकार मायनॉरिटीत आहे की नाही हे विधानसभा ठरवेल. विधासनभेत जेव्हा बहुमत सिद्ध करावे लागेल तेव्हा सर्व कळेल.
4. अशी स्थिती अनेकदा पाहिली आहे. त्यातून मात करून हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यंच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे हे संबंध देशाला कळेल
5. अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून भाजपा या बंडामागे नसल्याचे म्हटले असावे. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे.
6. एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. माझ्याकडे देशातील सर्व पक्षाची यादी आहे. त्यात सहाच पक्ष आहेत. आता तुम्हीच सांगा सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादीचा यात हात आहे का.
7. सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक दिसली. ती अजित पवारांच्या परिचयाची आहेत असं वाटत नाही.पण माझ्या परिचयाची आहेत. उदा. सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष पाटील मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहे. त्यांचा सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा. आसाममध्ये राज्य सरकार व्यवस्था करण्यात एक्टिव्ह आहे.
8. बंडखोर आमदारांना इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही.
9. निधी ही वस्तुस्थिती नाही. असत्यावर आधारीत त्यांचे आरोप आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला तो पक्षांतरबंदीच्या विरोधातील आहे. त्याचा फटका त्यांना बसेल.
10. छगन भुजबळांनी बंड केलं, तेव्हा त्यांच्यासोबत १६ लोक होते. निवडणुकीनंतर एक सोडला तर सर्वांचा पराभव झाला. आता आसामला गेलेल्या लोकांबाबत ही स्थिती होऊ शकतो. म्हणून निधीचं कारण पुढे करण्यात आलं आहे.