Cm Uddhav Thackeray : 8 जूनला मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांची सभा, विरोधकांची लायकी नाही हिंदुत्वावर बोलायची, राऊतांचा हल्लाबोल

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांना सडेतोड उत्तर द्यायची गरज नाही. हिंदुत्वावर बोलण्याची यांची लायकी नाही. हे बोगस आणि भमंपक लफंगे असल्याचे म्हटले आहे.

Cm Uddhav Thackeray : 8 जूनला मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांची सभा, विरोधकांची लायकी नाही हिंदुत्वावर बोलायची, राऊतांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:20 PM

मुंबई : राज्यात सुरू असणाऱ्या विविध घडामोडीवर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. महाराष्ट्रातील मशीदीवरील भोंग्यावरून सुरू झालेले राजकारण आता हिंदुत्वावर (Hindutva) गेले आहे. तर राज्यात सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली असे म्हणत विरोधी भाजपकडून तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून टीकास्त्र सोडले जात आहे. तर राज्यात भाजप आणि मनसेकडून सभांचे अयोजन केले जात असून त्यातून शिवसेनेला घेरण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. अशा स्थितीत शिवसेनेकडून (Shiv Sena) पलटवार होणार का? समोरून होणाऱ्या टीकेली उत्तर दिलं जाणार का? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला होता. त्याचं उत्तर आता शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलं असून 8 जूनला मराठवाड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची सभा होणार असल्याचे घोषित केलं आहे. तसेच विरोधकांची हिंदुत्वावर बोलायची लायकी नाही असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी आज बोलविण्यात आलेल्या बैठकीचा मुख्य विषय हा संघटनात्मक बांधणी संघटनेचा विस्तार होता असे सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी भाजप आणि मनसेसह शिवसेनेला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच राज्यातील आजच्या घडणाऱ्या घडामोंडीवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष आहे. तर येत्या 8 जूनला मराठवाड्यात शिवसेनेवर आणि हिंदुत्वावर बोलणाऱ्यांना योग्य संदेश मुख्यमंत्री ठाकरे देतील असेही त्यांनी सांगितलं.

त्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय?

त्याचबरोबर त्यांनी विरोधक म्हणजे कोण? त्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? या देशात सगळ्यात जास्त हिंदुत्वासाठी त्याग शिवसेनेनं केल आहे. तर हिंदुत्वासाठी आवाज उठवल्याने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. 1992 मध्ये शेकडो शिवसैनिकांचं बलिदान गेलं आहे. त्यावेळी हे कोठे होते. आज जे हिंदुत्वावर बोलत आहेत. त्यावेळी शेपटा घालून बसले होते असा घणाघात विरोधकांवर आणि हिंदुत्वावर बोलणाऱ्यांवर केला आहे.

हिंदुत्वावर बोलण्याची यांची लायकी नाही

त्याचबरोबर त्यांनी, हिंदुत्वावर बोलणाऱ्यांच्या हिंदुत्वावर बोट ठेवत, हिंदुत्वासाठी रक्त सोडा धाम तर तरी सांडला आहे का असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांना सडेतोड उत्तर द्यायची गरज नाही. हिंदुत्वावर बोलण्याची यांची लायकी नाही. हे बोगस आणि भमंपक लफंगे असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना हिच हिंदुत्वाची खरी रक्षक

तर ज्याप्रमाणे भाजपकडून ओवेसी यांना मत कापण्यासाठी उभ केलं जात त्याचप्रमाणे काही हिंदु ओवेसी उभ केलं जात आहे. जे त्यांच्यावर नंतर उलटेल. मराठी असो की हिंदु समाज हा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना हिच हिंदुत्वाची खरी रक्षक असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.