अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर

नवाब मलिक म्हणाले की, एका अधिकाऱ्याच्या मुलालाही मुद्दाम बोगस केसमध्ये अडकवण्यात आलं आहे. त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं आहे.

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस.
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 11:49 AM

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका बोगस केसमध्ये अडकवलं आहे. हा राजकीय डाव आम्ही उलटवून लावू, असा दावा गुरुवारी नवाब मलिका यांनी केला. मलिक यांनी यावेळी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातही मोर्चा उघडला. वानखेडेंनी एका अधिकाऱ्याच्या मुलाला ड्रग्जच्या बोगस केसमध्ये अडकवलं. त्याविरोधात बोलू नये म्हणून दबाव टाकण्यात येतोय, असा दावा त्यांनी केला. सोबतच त्यांच्याविरोधात महापालिका आणि शाळेचे दस्तावेज कोर्टात दिल्याचंही सांगितलं. मलिकांचे आरोप आणि दावे पाहता येणाऱ्या काळात वानखेडे यांच्याकडून यावर कोणी बोलणार का, की ते स्वतः मीडियात आपली बाजू मांडणार याची उत्सुकता आहे.

देशमुखांना अडकवले

नवाब मलिक पुढे म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरार आहेत. विशेष म्हणजे तेच तक्रारदार आहेत. त्यामुळं माजी मंत्री अनिल देशमुख यांना अडकवण्याचा हा राजकीय डाव आहे, पण हा डाव आम्ही उलटवून लावू. तक्रारदार फरार आहेत, तर चौकशी कशी होणार, असा सवालही त्यांनी केला. अनिल बोंडे एका क्लाऊडवर बोलत होते. त्यात त्यांनी काही विधान केलं आहे. दंगलीसंदर्भातला जो ऑडियो आहे, तो मी ट्विट केला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

एका महिलेवरही दबाव

नवाब मलिकांनी आजही आक्रमक भूमिका घेतली. पत्रकारांशी बोलतना ते म्हणाले की, एका अधिकाऱ्याच्या मुलालाही मुद्दाम बोगस केसमध्ये अडकवण्यात आलं आहे. त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं. जे आधी लग्न झालं होतं, त्या महिलेला आता धमकावण्यात येत आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील एका मुलाला ड्रग प्रकरणात पकडण्यात आलंय. त्यांनी विरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकला जातोय, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केली.

कागदपत्रे दिली

मलिक यांनी यापूर्वी समीर वानखेडे यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले होते. ते त्यांचा उल्लेख नेहमीच समीर दाऊद वानखेडे असा करतात. आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत माहिती दिली. मलिक म्हणाले की, वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्याविरोधात‌ केस टाकली आहे. त्यात आम्ही काही अतिरिक्त कागदपत्रे दिली आहेत. त्यात शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला आहे. आम्ही पालिकेकडून आणि शाळेकडून मिळालेले दस्तावेज कोर्टात दाखल केले आहेत.

इतर बातम्याः

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती

Controversial Health Exam: तक्रारींच्या निराकरणानंतरच नियुक्त्या; आरोग्य मंत्र्यांचे आदेश

Nashik| महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांचा घरच्या नगरसेवकांकडून करेक्ट कार्यक्रम, Water Grace घोटाळ्याचे महासभेत फोडले बिंग!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.