Nagpur Crime | नागपूरच्या ज्या एरियात केली नोकरी तिथंच चोरी; चाकूच्या धाकावर का केली लुटपाट?

नागपुरात भरदिवसा लुटमार करण्यात आली. चाकूचा धाक दाखवून चोरट्याने दागिने लुटले. दुसऱ्या घटनेत चेन घेऊन पसार झाला. या घटनांमुळं नागपूरकर हादरले आहेत.

Nagpur Crime | नागपूरच्या ज्या एरियात केली नोकरी तिथंच चोरी; चाकूच्या धाकावर का केली लुटपाट?
तहसील पोलीस.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 1:47 PM

नागपूर : उपचारासाठी पैसे पाहिजे म्हणून दोन ठिकाणी चाकूच्या धाकावर लुटपाट (Looting at knife point ) करण्यात आली. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीत आणि नंदनवन पोलीस (Nandanvan Police) स्टेशन हद्दीत भर दुपारी लुटपाट करण्यात आली. पहिली घटना इतवारी मार्केटमधील जैन मंदिराजवळची तर दुसरी वाठोडा रोडवर घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लुटपाट केलेल्या दोन्ही ठिकाणी आरोपीने चालक म्हणून नोकरी केली होती.  नागपुरात एका आरोपीने दोन ठिकाणी चाकूचा धाक दाखवत लुटपाट केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस तपासात उपचारासाठी पैश्याची गरज असल्याने लुटपाट केल्याची आरोपीने कबुली दिली. महत्वाचं म्हणजे या दोन्ही ठिकाणी आरोपीने चालक म्हणून नोकरी केली होती.

एटीएम कार्ड, रिंग घेऊन आरोपी पसार

नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे रोहित शाह यांचे इतवारी मार्केट, जैन मंदिराजवळ अमृत पॅलेस येथे घर आहे. या इमारतीमध्ये भर दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी ही घरात एकटी होती. आरोपीने दुपारच्या वेळी घरात प्रवेश करून मुलीच्या गळ्यावर चाकू लावला. पैसे आणि दागिने मागितले. तिच्याच जवळ पैसे नसल्याने या तरुणीने जवळचे atm कार्ड आणि कानातील रिंग त्या आरोपीला दिले. त्यानंतर आरोपी पसार झाला.

चाकूचा धाक दाखवून चेन पळविली

नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कमला इंगळे वय 60 वर्ष घरी एकटे होते. वाठोडा रोडवर राहणाऱ्या इंगळे यांच्या घरी पण आरोपीने चाकू दाखवून सोन्याची चेन घेऊन फरार झाला. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी पद्धत एकच होती. पोलिसांनी कसून तपास सुरू केला. आरोपीला 12 तासांमध्ये तहसील पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने अटक केली. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला असल्याची माहिती एसीपी सचिन थोरबोले यांनी दिली.

उपचारासाठी हवे होते पन्नास हजार

आरोपीने कबुली दिली की, मला एक आजार आहे. त्याच्या उपचारासाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च लागणार आहे. त्यासाठी मी हे काम केले. महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी त्याने ही लुटपाट केली त्या दोन्ही ठिकाणी आरोपीने एकएक महिना चालक म्हणून नोकरी केली होती.

Nagpur bird | तलावातील प्लास्टिक पक्ष्यांच्या जीवावर, नागपुरातील पक्ष्यांना नेमका धोका काय?

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता

भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, विजय रहांगदळेंच्या मुलाचा वर्ध्यातील कार अपघातात दुर्दैवी अंत

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.