हे 11 नेते ठरले रावण… मराठा क्रांती मोर्चाने केले पुतळ्याचे दहन, कोण आहेत ते नेते?

दर वर्षी दसऱ्याला रावण पुतळ्याचे दहन करण्यात येते. मात्र, यावर्षी दसऱ्याला रावणरुपी 11 सर्वपक्षीय नेत्यांच्या पुतळ्याचे दहन मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही विरोधी पक्ष नेते, पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिमा लावलेल्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हे 11 नेते ठरले रावण... मराठा क्रांती मोर्चाने केले पुतळ्याचे दहन, कोण आहेत ते नेते?
SOLAPUR ANDOLANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 5:17 PM

सागर सुरवसे, सोलापूर | 24 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारने दिलेल्या चाळीस दिवसांच्या मुदतीचा आजचा अखेरचा दिवस आहे. तर, मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय जाहीर न केल्यास 25 तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत नेते, आमदार, मंत्री यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर विविध जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेते, आमदार, मंत्री यांना गावबंदीचे फलक झळकले. सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.

सोलापुरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 50% च्या आत आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण न दिल्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही. त्याचबरोबर मराठा बांधवांनी आत्महत्या न करता अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन आंदोलनकर्ते करत आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली दसऱ्याला रावणरुपी 11 सर्वपक्षीय नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि वकील गुनरत्न सदार्वते अशा ११ नेत्यांचे फोटो लावलेल्या रावणरुपी पुतळ्याचे दहन केले.

हे सुद्धा वाचा

गेल्या ३ दिवसात २ समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले. आतापर्यंत मराठा समाजातील ५० बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली. त्यामुळे समाज बांधवांनो आत्महत्या न करता मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात उभा करा. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला ५०% च्या आत आरक्षण द्यावे अन्यथा पुढील काळात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाविरोधात गनिमी काव्याने मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम भैय्या जाधव यांनी यावेळी दिला.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.