दारूसाठी चोरट्यांनी नादच केला…चोरीची घटना ऐकून पोलीसही चक्रावले….
नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पेठरोडवर कार्यालय आहे आणि त्याच कार्यालयाच्या गोडावूनमध्ये चोरी झाली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये चोरट्यांनी दारऊसाठी केलेली चोरी चर्चेचा विषय ठरत आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाल्याने दारू चोरीची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाच्या जवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या गोडावूनमध्येच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत विदेशी दारू लंपास केली आहे. गोडावून मधून तब्बल ४ लाख ८८ रुपये किमतीचे विदेशी मध्याचे एकुण ६५ बॉक्स चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. बाबत पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये जयराम श्रावण जाखेरे यांच्या फिर्यादीहून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस पी. एस. देवरे करीत आहे.
नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पेठरोडवर कार्यालय आहे आणि त्याच कार्यालयाच्या गोडावूनमध्ये चोरी झाली आहे.
आदिवासी कॉलनी, बिल्डींग नं १ या ठिकाणी राज्य उत्पादन विभागाकडुन जप्त केलेला मुद्देमाल गोडावून मध्ये ठेवण्यात आला होता.
त्याची माहिती चोरट्यांना लागल्याने त्यांनी गोडावुनच्या खिडकीचे गज कापुन गोडावून मधून तब्बल ४ लाख ८८ रुपये किमतीची विदेशी दारू चोरली आहे.
विदेशी मद्याचे एकुण ६५ बॉक्स चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. गोडावून मध्ये कारवाई केलेली विदेशी दारू ठेवण्यात आलेली होती.
पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये जयराम श्रावण जाखेरे यांच्या फिर्यादीहून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस पी. एस. देवरे करीत आहे.
या चोरीच्या घटणेने नाशिक शहरात खळबळ उडाली असून ही दारू चोरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून चर्चेला उधाण आले आहे.