नाशिकमध्ये आगीची तिसरी घटना, गॅस सिलेंडर वाहतूक वाहनाने घेतला पेट नंतर झाला ब्लास्ट

आग लागताच अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आले होते, मात्र आग विझवण्याची प्रक्रिया सुरू करत असतांनाच स्फोट झाला.

नाशिकमध्ये आगीची तिसरी घटना, गॅस सिलेंडर वाहतूक वाहनाने घेतला पेट नंतर झाला ब्लास्ट
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 4:53 PM

नाशिक : नाशिकमध्ये वाहनाला आग (Fire) लागल्याची तिसरी घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नाशिकमधून निघत नाही तोच नाशिकच्या मालेगाव-मनमाड रोडवर (Malegaon – Manmad Road) मोठी आगीची घटना घडली आहे. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणार वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. याच वेळी आग लागल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर 20 ते 25 फुट सिलेंडर हवेत उडल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी तब्बल दोन्ही बाजूने चार किलोमीटर पर्यन्त वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर टँकर आणि खाजगी बसचा अपघात आणि त्यांनंतर बसला लागलेली आगीची घटना समोर आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच वणी गडावर जाणाऱ्या शासनाच्या बसला भीषण आग लागली होती. आणि त्यानंतर मालेगाव-मनमाड येथील घटना समोर आली आहे.

दरम्यान या दोन्ही घटना ताज्या असतांना मालेगावकडून मनमाडकडे जात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीला कानडगाव शिवारात आग लागली होती.

आग लागताच अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आले होते, मात्र आग विझवण्याची प्रक्रिया सुरू करत असतांनाच सिलेंडरचा स्फोट झाला होता.

हे सुद्धा वाचा

गाडीत असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने जवळपास 20 ते 25 फुट हवेत सिलेंडर उडाले होते. ही संपूर्ण घटना परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली होती.

दरम्यान, काही दिवसांपासून वाहनांना आग लागल्याची घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून यावर उपायोजना करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.