AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी, संत महंतांसह ‘या’ VIP व्यक्तींना निमंत्रण, डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाल्याने नव्या सरकारच्या भव्य शपथविधीची तयारी सुरू आहे. भाजपकडून जोरदार तयारी केली जात असून, देशभरातील मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यात संत, महंत आणि कलाकारांचीही उपस्थिती असणार आहे.

महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी, संत महंतांसह 'या' VIP व्यक्तींना निमंत्रण, डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा
मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 3:49 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असं यश आलं आहे. त्यामुळे महायुती यावेळी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा करण्याच्या तयारीत आहे. येत्या 5 डिसेंबरला म्हणजेच पुढच्या दोन दिवसांनीच मुंबईतील आझाद मैदानात नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी भाजपकडून प्रचंड तयारी सुरु आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातही वेगवान हालचाली सुरु आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. शपथविधीच्या या ग्रँड महोत्सवात केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

कोण कोणत्या नेत्यांना शपथविधीचे निमंत्रण?

भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळ्याचं देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाकुणाला शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

हे सुद्धा वाचा

‘या’ मुख्यमंत्र्यांना शपथविधीचे निमंत्रण

  • योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
  • चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
  • नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार
  • प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
  • हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
  • विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ
  • प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा
  • भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात
  • नायब सिंग सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा
  • मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
  • कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय
  • भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान
  • मानिक साहा – मुख्यमंत्री, त्रिपुरा
  • पुष्कर सिंग धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड

शपथविधीचं ‘या’ संत-महंतांना विशेष निमंत्रण

  • नरेंद्र महाराज नानीद
  • नामदेव शास्त्री, भगवानगड
  • राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
  • गौरांगदास महाराज, इस्कॉन
  • जनार्दन हरीजी महाराज
  • प्रसाद महाराज अंमळनेरकर
  • महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज
  • जैन मुनी लोके

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांच्या दालनात बैठक

शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडल्याची माहिती आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी, आमदार प्रसाद लाड आणि मोहीत कंबोज उपस्थित होते.

पोरांनो ऑल द बेस्ट, उद्या लागणार 10 वीचा निकाल, 'या' लिंकवर बघा रिझल्ट
पोरांनो ऑल द बेस्ट, उद्या लागणार 10 वीचा निकाल, 'या' लिंकवर बघा रिझल्ट.
.. पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय म्हणाला?
.. पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय म्हणाला?.
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात.
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा.
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती.
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती.
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?.
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च.
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.