Rupali Chakankar: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची अडीज वर्ष जबाबदारी सांभाळली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सूत्रे हातात घेत अतिशय ताकदीने काम केलं. याचंच बक्षीस म्हणून त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं.
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar)यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन (threatened call) करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्या धमकीमुळे राज्यात खळबळ माजली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा कारभार हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका लावला होता. तर त्यांनी अनेक नेत्यांना राज्य महिला आयोगाचा दणका दाखवला होता. त्यानंतर असे धमकीचे फोन आल्याने चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे.
अगोदरही दोन वेळा त्यांना धमकीचे फोन
राज्यात महिलांच्या बाबतीत काही घडले आणि त्याची तक्रार जर राज्य महिला आयोगाकडे गेल्यास रुपाली चाकणकर स्वत: लक्ष घालत होत्या. अशातच रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन कॉल आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात रुपाली चाकणकर यांना पुढच्या 24 तासांत जीवे मारु, असा धमकीचा फोन गेला आहे. हा फोन महिला आयोगाच्या कार्यालयात आलेला होता. रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. तर याअगोदरही दोन वेळा त्यांना धमकीचे फोन गेले होते. तर रुपाली चाकणकर तुमचा कार्यक्रम करु, अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर कोण आहेत?
रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. जुलै 2019 मध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादीने महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मार्च 2022 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची अडीज वर्ष जबाबदारी सांभाळली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सूत्रे हातात घेत अतिशय ताकदीने काम केलं. याचंच बक्षीस म्हणून त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं.