Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज तब्बल 11 हजार 877 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 2 हजार 69 कोरोना रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत.

Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:14 PM

आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज तब्बल 11 हजार 877 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 2 हजार 69 कोरोना रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचेही नवे 50  रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखीच वाढली आहे. राज्यातला आकडा तर 12 हजारांच्या जवळ गेल्याने चिंता वाढलीच आहे. मात्र यापेक्षाही जास्त चिंता वाढवली आहे मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने. आज फक्त मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने 8 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त धास्ती आहे. राज्यात रोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. कोरोनाने हैराण केले असतानाच ओमिक्रॉननेही पाय पसरले आहेत, त्यामुळे दुहेरी संकट थोपवण्याचे आव्हान प्रशासनासह सर्वासमोर असणार आहे.

लसीकरणावर राज्य सरकारचा भर

रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्य सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. राजधानी मुंबईच्या प्रशासनाकडूनदेखील खरबदारी म्हणून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई मनपाने आगावीची तयारी केली आहे. शहरातील बीकेसी येथे जंबो व्हॅक्सिनेशन सेंटर उभारण्यात आले असून येथे 15-18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते.

निर्बंध आणखी कडक होण्याची दाट शक्यता

राज्यात सध्या होणारी कोरोना रुग्णांची वाढ स्फोटक असल्याने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून राज्यातले आणि मुंबईतले निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत, मात्र तरीरी रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसून येत नाही, त्यामुळे हेच निर्बंध आणखी कडक होऊ शकतात.

Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!

आयपीओ ट्रॅकर: 23 कंपन्या 44 हजार कोटी, मार्च तिमाहीत गुंतवणुकीची बंपर संधी!

IND vs SA: ‘घाबरुन जाण्याची गरज नाही’, दुसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकन कर्णधाराचं वक्तव्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.