नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव, परदेशी प्रवास न केलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण
नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळत (Total Corona Patient in Maharashtra) आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 210 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 आणि अहमदनगरमध्ये 2 असे रुग्ण सापडले आहेत. तर नुकतंच नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये सापडलेला या रुग्णाने कोणत्याही देशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे त्याला संसर्गातून कोरोनाची लागण झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये आढळलेला हा रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी आहे. त्याच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक व्यक्ती रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पुण्याहून कोल्हापूरला नातेवाईकाकडे आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या बहिणीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात 2 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.
यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्यसरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे 1000 रुग्णालयांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार आहेत”
“कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेत राज्यभरातील 492 खासगी रुग्णालये सहभागी आहेत. येत्या 1 एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन 1000 रुग्णालयांचा समावेश होईल. जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार आहे. यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान 2000 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात. त्याचबरोबर सुमारे 1 लाख खाटाही यामाध्यमातून उपलब्ध होणार आहेत”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?
मुंबई – 85 पुणे – 27 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर – 14 कल्याण – 7 ठाणे – 5 नवी मुंबई – 6 यवतमाळ – 4 (यवतमाळ येथील 3 रुग्ण चाचणी निगेटीव्ह ) अहमदनगर – 5 सातारा – 2 कोल्हापूर – 2 गोंदिया – 1 पनवेल – 2 उल्हासनगर – 1 वसई विरार – 4 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 पुणे ग्रामीण- 1 पालघर- 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 01
एकूण 210
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च बुलढाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 29 मार्च
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
Corona : मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण, 50 जवानांना क्वारंटाईन
भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार
Corona LIVE: नागपूरकरांना दिलासा, कोरोनाचे आणखी दोन रुग्ण बरे
कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला
Total Corona Patient in Maharashtra