राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1761 वर, कोणत्या ठिकाणी किती रुग्ण?

राज्यात आज (11 एप्रिल) कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1761 वर, कोणत्या ठिकाणी किती रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 11:28 PM

मुंबई : राज्यात आज (11 एप्रिल) कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत 208 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. अशाप्रकारे सध्या राज्यात 1426 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 36 हजार 771 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 208 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यासोबतच राज्यात एकूण 38 हजार 800 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 4964 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

आज राज्यात 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईचे 12 तर पुणे येथील 2, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 6 महिला आहेत. या 17 मृत्यूंपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, 8 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर 3 जण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 17 पैकी 16 रुग्णांमध्ये (94 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता.

शुक्रवारपासून (10 एप्रिल) केंद्रातील अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. के. सेन यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय शीघ्र प्रतिसाद पथक पुणे येथे कोविड 19 प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेत आहे. या पथकामध्ये डॉ सेन यांच्यासोबत डॉ. रोहित बन्सल, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉ. सौरभ मित्रा भूल तज्ज्ञ यांचाही समावेश आहे. या पथकाने मागील 2 दिवसात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध आणि वाय सी एम रुग्णालय (पिंपरी) येथे भेट दिली.

कोणत्या ठिकाणी किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

Total Corona Patient in Maharashtra

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.