Hijab Controversy : शाळेत जाताना शाळेचा गणवेशच हवा, उद्या कुणीही उठून काहीही करेल-तृप्ती देसाई
हिजाब वादात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. हिजाब वरून जे हिंदू मुस्लिम वातावरण तापले आहे. ते चुकीचे आहे. खरं तर शाळेत जाताना शाळेचा गणवेश परिधान करणे हेच योग्य आहे. उद्या कोणीही ही उठून काहीही करेल. ज्याला त्याला व्यक्तिगत स्वतंत्र आहे. पण शाळेत नको. असे वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केले.
सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून देशात हिजाबचा (Hijab Controversy) वाद पेटला आहे. हिजाबच्या समर्थनार्थ राज्यभर मुस्लिम महिला (Muslim Women) आणि विवध राजकीय पक्षांची आंदोलनही (Hijab Protest) झाली. यावर दोन्ही बाजूने राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एक गट हिजाबचे समर्थन करणारा आहे. तर दुसरा गट विरोध करणारा. अशावेळी हिजाब वादात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. हिजाब वरून जे हिंदू मुस्लिम वातावरण तापले आहे. ते चुकीचे आहे. खरं तर शाळेत जाताना शाळेचा गणवेश परिधान करणे हेच योग्य आहे. उद्या कोणीही ही उठून काहीही करेल. ज्याला त्याला व्यक्तिगत स्वतंत्र आहे. पण शाळेत नको. असे वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केले, त्या सांगलीत बोलत होत्या. शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देण्याची मागणी करणाऱ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठा झटका दिलाय. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
वाईन विक्रीबाबत काय म्हणाल्या देसाई?
आण्णा हजारे यांनी वाईन वरून आंदोलन करणार आहेत, याबाबत त्यांना विचारले असता या वयात आंदोलन करणे हे आश्चर्य कारक म्हणावं लागेल. कारण अण्णानी या दारू बंदी विरोधात चळवळ उभी केली होती. तसेच या सरकारने जनतेची मतं ऐकून निर्णय घेणार असे म्हणाले. पण जनतेतून या वाईन विक्रीला विरोध आहे. सरकारला हा निर्णय माघे घ्यावा लागेल. अशा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या महिलांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या नाहीत. अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा कश्या असू शकतात. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे. सरकारने वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. तो चुकीचे आहे. एकविसाव्या शतकात तरुण पिढी व्यसनाधीन सरकारला करायची आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
स्त्री भ्रूणहत्येविरोधात ठोस पावलांची गरज
त्यांनी स्त्री भ्रूणहत्येवरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. स्त्री भ्रूणहत्या विरोधात सरकार किती सवेदनशील आहे. हे दाखवण्याची वेळ आली आहे. एकीकडे बेटी बचाव बेटी पाढाओ मोहीम राबवतात. आणि सांगलीच्या म्हैशाळ मधील प्रकरण मध्ये सरकार वकील नेमता येत नाही. त्याला विलंब लागत आहे. सरकारी वकील नेमलाच पाहिजे आणि या प्रकरणात जे प्रशासकीय अधिकारी दोषी आहेत. त्याच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तुमच्या पार्ट्यांचे पैसे कुणी दिले? उत्तर द्या संजय राऊत, सोमय्यांचं थेट आव्हान